सांगली : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा प्रचार केल्यामुळे जतचे सरदार पाटील यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा देण्याचा आदेश काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीत आपण महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांचा प्रचार केला नाही म्हणून राजीनामा मागितला असता तर उचित ठरले असते असे सांगत आपण गुरुवारी राजीनामा देत असल्याचे पाटील यांनी  सांगितले. श्री. पाटील हे भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यामुळे त्यांना काँग्रेसच्या कोट्यातून जिल्हा बँकेचे संचालक पद देण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> विट्याजवळ १० लाखाची २४० गांजा झाडे जप्त, एकाला अटक

लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, पाटील यांनी या सूचनेकडे दुर्लक्ष करत भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांचा उघड प्रचार केला. यामुळे त्यांनी जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा द्यावा असे आदेश आ. सावंत यांनी दिले आहेत. दरम्यान, श्री. पाटील म्हणाले राजीनामा उद्या (गुरुवारी) देत असल्याचे सांगत ज्या कारणासाठी राजीनामा देण्यास सांगितले ते कारण संयुक्तिक वाटत नाही.