नगरपंचायतीनंतर दापोलीत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघम सुरू झाले असून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस चारही पक्षांची वेगाने चाचपणी सुरू झाली आहे. या मोहिमेमध्ये शिवसेना आघाडीवर असली तरी यानिमित्ताने माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यातील वादाने पुन्हा गंभीर वळण घेतले आहे. पक्षाचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष संदीप राजपुरे यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी निमंत्रित केलेल्या बठकीत झालेली शाब्दिक चकमक त्याचेच द्योतक ठरले. विशेष म्हणजे या वेळी मुलाखत घेऊन उमेदवार ठरवण्यासाठी उपस्थित झालेले पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांच्यासह संदीप राजपुरे यांना बठकीतून बाहेर जाण्याची वेळ आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गटबाजीचे सावट पडूनही नगरपंचायत निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेने मान मिळवला. त्यामुळे सूर्यकांत दळवी समर्थकांचे मनोबळ वाढले. त्यातही सूर्यकांत दळवी यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विभागवार बठकांचे आयोजन काही महिन्यांपूर्वीपासूनच सुरू केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष असलेल्या रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांना दळवी यांच्या या मोच्रेबांधणीमुळे चांगलाच शह मिळाला. विधानसभा निवडणुकीत प्रभाव पाडण्यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटावर स्वत:च्या समर्थकांचे वर्चस्व असणे गरजेचे असते. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीनंतर दळवी समर्थकांच्या ‘मिशन पंचायत समिती’ला रामदास कदम समर्थकांकडून साहजिकच अडथळा होण्याची शक्यता होती. त्यादृष्टीने दापोलीतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष सचिन कदम येणार असल्याचे अचानक फर्मान आले. विधानसभा क्षेत्राध्यक्ष या नात्याने संदीप राजपुरे यांनी तशी बठकही आयोजित केली, पण या पायंडय़ाला दळवी समर्थक  कार्यकर्त्यांनी बेशिस्त ठरवत मुलाखतीचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शुक्रवारी दळवी यांच्या अध्यक्षतेखाली बठक घेऊन स्थानिक स्तरावर कोअर कमिटी नेमून उमेदवार निश्चितीची प्रक्रिया पार पाडण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. आता रामदास कदम समर्थक स्वत:ची ताकद सिद्ध करण्यासाठी काय पावले उचलणार, याकडे सर्वाचे लक्ष आहे.