वाई: जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लघंन केल्या प्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह ४८ जणांची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.सातारा शहरात ६ ऑक्टोबर २०१७ रोजी आनेवाडी टोल नाक्यावरून वाद झाला होता.शासकीय विश्रामगृह येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांकडून याप्रकरणावरून गोंधळ झाला होता. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लघंन केल्याच्या कारणातून सातारा शहर पोलीस ठाण्यात कर्मचारी झोपाळे यांनी गुन्हा दाखल केला होता.
दि. ६ ऑक्टोबर २०१७ रोजी सायंकाळच्या सुमारास शासकीय विश्रामगृहावर जमलेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष ॲड विक्रम पवार, माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते रवी पवार, फिरोज पठाण यांच्यासह ४८ जणांच्या विरोधात दि. ११ ऑक्टोबर २०१७ पुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिसांनी दोषारोप पत्र सादर केले होते. यावर न्यायालयात दुसरे तदर्थ जिल्हा सत्र न्यायाधिश साळवे यांच्यासमोर सुनावणी सुरु होती.सरकार पक्षाच्यावतीने पाच साक्षीदार तपासण्यात आले. हे पाचही साक्षीदार पोलीस कर्मचारी होते. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह इतरांच्या वतीने ॲड वसंत नारकर आणि शिवराज धनावडे यांनी हा गुन्हा आमच्या आशिलांना मान्य नाही, चुकीच्या पद्धतीने फिर्याद दाखल करण्यात आली आहे, असे म्हणणे न्यायालयात मांडले.
हेही वाचा >>>संदीप-सलील यांचं ‘हृदय में श्रीराम है’ गाणं देवेंद्र फडणवीसांनी केलं पोस्ट म्हणाले, “अत्यंत भक्तिमय…”
या प्रकरणात न्यायालयाने दोन्ही बाजूकडून म्हणणे ऐकून घेतले. सरकार पक्षाचा युक्तीवाद फेटाळून लावत बचाव पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह ४८ जणांची निर्दोष मुक्तता केली.या निकालाने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.आमदार शिवेंद्रसिंहराजे निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात हजर होते. निकालामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.याच दिवशी कोजागिरीच्या पोर्णिमेच्या रात्री शक्रवार पेठेत गोळीबारही झाला होता.त्याचा वेगळा गुन्हा दाखल होता.