अलिबाग तालुक्यातील मोठे शहापूर येथील चारमिनार चॅलेंज ग्रुप सामाजिक सांस्कृतिक मंडळ व शहापूर विभाग राष्ट्रवादीने शनिवार, २३ मार्च रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पध्रेचे आयोजन केले आहे. या स्पध्रेचे उद्घाटन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी १० वाजता होणार असून याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश धुमाळ, माजी आ.मधुकर ठाकूर, प्रदेश प्रतिनिधी विजय कवळे, सुरेश विलणकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत गोंधळी, हर्षल पाटील उपस्थित राहणार आहेत. रात्री स्पध्रेचा बक्षीस समारंभ जि.प.चे पक्षप्रतोद महेंद्र दळवी, अलिबाग शहर अध्यक्ष अ‍ॅड.महेश मोहिते, उद्योजक विजय साळवी, नरेश चवरकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून अलिबाग तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष मििलद कवळे, युवक अध्यक्ष राजा केणी, जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. जनार्दन पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
स्पध्रेतील प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या संघाला ३३ हजार ३३३, द्वितीय क्रमांकाला २२ हजार २२२ तर तृतीय व चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी ११ हजार १११ रुपये रोख तसेच चषक देण्यात येणार आहे, अशी माहिती अलिबाग तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष परशुराम म्हात्रे, चारमिनार चॅलेंज ग्रुपचे अध्यक्ष अलंकार पाटील यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा