ललित
मराठीतील चोखंदळ वाचकांच्या सर्व गरजा भागविणाऱ्या ‘ललित’ मासिकाचा दिवाळी अंक वाचकाला ग्रंथप्रेमाचे भरते आणण्यात कायम यशस्वी ठरतो. विशिष्ट विषयाचे अनेक पैलू मांडणारा विभाग, नव्या-जुन्या देशविदेशी लेखकांवर प्रकाश पाडणारे मान्यवरांचे दणकट लिखाण आदी अनेक बाबींनी हा अंक समृद्ध असतो. यंदा ‘प्रकाशन क्षेत्रातील संपादकांची भूमिका’ या लेखमालेद्वारे दिग्गज संपादक आणि लेखकांना ललितने एकत्र आणले आहे. रत्नाकर मतकरी, मिलिंद बोकील, नीरजा, मोनिका गजेंद्रगडकर, आसाराम लोमटे, विनय हर्डीकर, मृदुला प्रभुराम जोशी, विनया खडपेकर आदींनी संपादन-संपादक या प्रक्रियेची साहित्य विकासाला गरज नक्की किती व कशी, याचा आढावा घेतला आहे. यातील विनय हर्डीकर यांचा लेख प्रत्येक साहित्यप्रेमी आणि साहित्यिकांच्या अनेक धारणांना छेद देणारा, म्हणून महत्त्वपूर्ण ठरावा असा आहे. गोविंद तळवलकर यांचा डॉ. झिवागोचा इतिहास, वसंत आबाजी डहाके यांनी मंगेश नारायणराव काळे यांच्या चित्रांवर लिहिलेला लेख, दीपक घारे यांनी किप्लिंग पिता-पुत्रांच्या अज्ञात पैलूवर पुस्तकाचा आधार घेऊन लिहिलेला लेख, अरुण नेरुरकरांचा एडगर अॅलन पो याचे रेखाटलेले व्यक्तिचित्र आदी उल्लेखनीय लेखनासोबत ललितचा नेहमीचा वाचनानंद याही वर्षी शाबूत आहे.
संपादक : अशोक कोठावळे
पृष्ठे : १९२, किंमत १२० रु.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा