कराड : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयातील वारकरी व भाविकांना आवश्यक त्या सोयी सुविधा देण्यात कसूर करू नये असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा येत्या १८ ते २३ जून या कालावधीत सातारा जिल्ह्यातून मार्गस्थ होत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री  विखे – पाटील यांनी फलटण व लोणंद येथील पालखीतळाची पाहणी केली. या वेळी पालखी वारीच्या तयारीचा जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेताना  ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विखे – पाटील म्हणाले की  संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मुख्य पालखीच्या सोबत नोंदणीकृत दिंड्या असाव्यात व त्यानंतर नोंदणी नाहीत अशा इतर दिंड्यांचा समावेश करावा म्हणजे प्रशासनाला सोयी सुविधांचे नियोजन करणे सोयीचे होईल. भाविकांना पालखी सोहळ्याच्या कालावधीत कुठलाही त्रास होणार नाही याची जिल्हा प्रशासनाने  काळजी घ्यावी. पालखी सोहळ्याच्या ठिकाणची पाहणी केली असता सोहळ्याचे नियोजन जवळपास पूर्ण होत आलेले आहे. लोणंद पालखी तळावरील विद्युतवाहक तारांमुळे वारकरी व भाविकांना त्रास होणार नाही यासाठी या विद्युतवाहक तारा  पालखीतळापासून दूर उभाराव्यात, अशा सक्त सूचनाही मंत्री विखे – पाटील यांनी यावेळी दिल्या.

हेही वाचा >>> आळंदी: राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे कीर्तनात तल्लीन!

लोणंद पालखीतळ येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी पालखी सोहळ्यासाठी केलेल्या नियोजनाची माहिती दिली. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, पालखी सोहळा प्रमुख आणि विशस्त तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dnyaneshwar maharaj palkhi providing facilities instructions to the administration of radhakrishna vikhe patil ysh