रत्नागिरी : उद्योग मंत्र्यांकडून फक्त गुंतवणूकदारांचा फायदा करून देण्यासाठी एमआयडीसीच्या घोषणा होत आहेत. हे काय सुरू आहे, याचा तपास करण्यासाठी कोकणातील एमआयडीसीच्या घोषणांची सीआयडी चौकशी करण्याची मागणी भाजपा नेते, माजी आमदार बाळ माने यांनी केली आहे. रत्नागिरीतल्या मतदाराला परिवर्तन हवं आहे. त्यामुळे विधानसभेच्या जागा लढवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे वरिष्ठांना कळवल्याचे माने यांनी स्पष्ट केले. माजी आमदार बाळ माने यांच्या या मागणीमुळे महायुतीतील वाद वाढत असल्याचे दिसून येऊ लागले आहे.

रत्नागिरीतील मिऱ्या एमआयडीसीबाबत माने म्हणाले की, मी मिऱ्याचा सुपुत्र आहे, माजी मंत्री पी. के. सावंत यांचा वारसदार आहे. १०५ आमदार असणाऱ्या पक्षाचा मी कार्यकर्ता आहे, पण ४० आमदारांच्या पक्षाचा उद्योगमंत्री ग्रामस्थांना विश्वासात न घेता घोषणा करतो. करबुडे पंचतारांकित एमआयडीसी व रिफायनरी प्रकल्प घालवायला हेच जबाबदार आहेत. वेळ बदलली की यांच्या घोषणा बदलतात. मिऱ्यामध्ये वनौषधी आहेत. त्यामुळे येथे लॉजिस्टिक पार्क सोयीचे नाही. भारती शिपयार्ड कंपनी बंद पडली होती तेव्हा यांनी त्यांची काळजी घेतली नाही. आज जे. के. फाईल्स बंद झाली. निवडणूक जाहीर झाली की यांच्या घोषणा केल्या जातात. गेली वीस वर्षे आमदार असणाऱ्याच्या घोषणांवर एक ग्रंथ तयार होईल.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
evm scam india alliance
ईव्हीएमचा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! ‘इंडिया’आघाडी याचिका दाखल करण्याची शक्यता
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
ai complexity
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता नियमनाची किचकट प्रक्रिया
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य

हेही वाचा – Marathwada Mukti Sangram Din : “…तर माझ्यासकट आख्खा पक्ष तुमच्यासाठी उभा राहील”, राज ठाकरेंचं मराठवाड्याला आश्वासन

उद्योगमंत्र्यांचा हेतू शुद्ध नाही. मिऱ्या गावात थेट नोटिसा आल्या. येथे वारस तपास केलेला नाही. आता बोंबाबोंब झाल्यानंतर मंत्री गाववाल्यांशी बोलणार आहेत. ४ वेळा निवडून आलात तर तुम्हाला जनतेची कदर पाहिजे होती. भाजपवाल्यांनी तुम्हाला मतदान केले आहे, पण हे सोयीस्कर विसरले आहेत. निवडणुकीत कोणाची पळताभुई होणार आहे ते पाहूया, असे खुले आव्हानच माने यांनी दिले. खासगीत हा देवेंद्र फडणवीस यांचा प्रकल्प आहे, असे सांगतात. पण मी त्यांचा निष्ठावान, प्रामाणिक सहकारी आहे. आमच्या नेत्यांनी आम्हाला बोलावले असते. पण भाजपाने सांगितले नाही. सामंत यांची वृत्ती म्हणजे संकट आले म्हणून दाखवायचे व मी दूर केले असे सांगायचे, अशी आहे.

मिऱ्या गावाला एमआयडीसीचे पाणी ३० वर्षे मिळत आहे. ती नळपाणी योजना आमदार स्व. कुसुमताई अभ्यंकर, स्व. शिवाजीराव गोताड व मी आमदार असताना केली. रत्नागिरीत ४ हजार मिलीमीटर पाऊस पडतो पण २० वर्षांत धरणांचा विकास झाला नाही. मॅनमेड क्रायसिस तयार करायचा, हे रत्नागिरीकरांनी भोगले आहे. मिऱ्याच्या पर्यटन विकासाकरिता भूसंपादनाची गरज नाही, असे माने यांनी ठणकावून सांगितले.

बारसू एमआयडीसी जाहीर होऊन २ वर्षे झाली, पण पुढे काही झाले नाही. संरक्षण विषयक प्रकल्प येणार असतील तर आम्ही स्वागत करतो. आम्हाला विकास पाहिजे, पण गुंतवणूकदारांचा विकास नको. बाल्को प्रकल्पाच्या जागेवर मूळ जागामालकांसाठी २०० कोटींचे पॅकेज करा, त्यांचे पुनर्वसन करा, गरज भासल्यास कायदा बदल करू शकतो.

हेही वाचा – Manoj Jarange : मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषणास्त्र, सरकारच्या अडचणींमध्ये भर पडणार?

रत्नागिरीत लांडगा आला रे आला असं चित्र आहे. गेल्या २० वर्षांत शाश्वत विकास व्हायला हवा होता, तो झाला नाही. जे त्यांनी केले सांगत आहेत ते सरकारने केले आहे. विमानतळ केंद्र सरकारने आणले, त्यात भाजपचे योगदान नाही क? जयगडला इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे तिथे लॉजिस्टिक पार्क करा, डिंगणी-जयगड रेल्वेमार्ग करा, चारपदरी रस्ता करा. आज कोणीच काही बोलत नाही म्हणून रत्नागिरीकरांची व्यथा प्रकट करतोय, असे बाळ माने म्हणाले.

पार्लमेंट ते पंचायतमध्ये भाजपाची सत्ता असावी हा हेतू ठेवून नरेंद्र मोदी व अमित शहा व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या सूचनांनुसार काम करतोय. महाराष्ट्रातही २८८ ठिकाणी आमदार उभे करण्यासाठी संकल्प आहे. लोकसभा निवडणुकीवेळी महायुती म्हणून लढताना आम्ही १० हजार मतांनी मागे पडलो. विधानसभेला मात्र विजयी उमेदवाराला जास्त मते होती. म्हणजे सर्व नेते मंडळींनी ग्राऊंड रिपोर्ट काढावा व कुठे कमी पडलो ते सांगावे, हे माझं व्यक्तीगत मत आहे.

Story img Loader