अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात तिसरा राजकीय भूकंप झाल्याची चर्चा आहे. अजित पवारच नाही तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, प्रफुल पटेल असे एकाहून एक महत्त्वाच्या शिलेदारांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसह जाणं पसंत केलं. तुमच्या विश्वासातले इतके लोक तिकडे गेले याचं दुःख वाटतं का? हा प्रश्न विचारला असता शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. शरद पवारांनी सातारा या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली त्यात या प्रश्नाला उत्तर दिलं आहे.

प्रश्न: भुजबळ, तटकरे, दिलीप वळसे पाटील ही सगळी विश्वासू मंडळी तुम्हाला सोडून गेल्याचं दुःख वाटतं का?

शरद पवार: अजिबात नाही! मला दुःख वाटत नाही. अशा गोष्टी घडल्यानंतर अंतिम रिझल्ट भले तो आज नसेल सहा महिन्यांनी लागला, वर्षभराने लागला तर तो रिझल्ट या देशातला सर्वसामान्य मतदार देतो. माझा विश्वास आणि सामान्य माणसावर आहे असं म्हणत शरद पवार यांनी विषय संपवला. कारवाई किंवा इतर कुठला विषय आहे त्याचा निर्णय हा जयंत पाटील घेतील असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar Reaction on saif ali khan
Sharad Pawar : सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; गृहमंत्र्यांकडे बोट दाखवत म्हणाले…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम

हे पण वाचा- “कालपर्यंत खोके म्हणणारे ओके होऊन आता…” नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

पक्षाच्या घटनेत मी बदल केले आहेत का हे माझ्या लक्षात नाही. जनरल बॉडीची मिटिंग घेऊन सहा महिने झाले. पक्षाची पुनर्बांधणी हा शिवधनुष्य वगैरे काहीही विषय नाही. लोक तुम्हाला शक्ती द्यायला तयार आहेत. लोकांना तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात भेटा तुम्ही सगळं पुन्हा उभं करु शकता असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर स्टेटमेंट केलं की आमच्या पक्षात भ्रष्टाचारी लोक आहेत. मात्र ज्या अर्थी त्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली त्यांच्याविषयी पंतप्रधानांनी योग्य माहिती घेतली नाही असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

प्रफुल पटेल म्हणाले की भाजपासह जाण्यासाठी आम्ही शरद पवारांची मनधरणी करत होतो पण त्यांनी ऐकलं नाही. यावर शरद पवार म्हणाले ही चांगलीच गोष्ट आहे यात वाईट काय? असा प्रश्न विचारतच शरद पवारांनी याचं उत्तर दिलं आहे. कुठे काही चुकीचं होत असेल, अन्याय होत असेल तर त्याविरोधात आवाज उठवायचा असेल तर योग्य ठिकाण सातारा आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Story img Loader