पुणेरी पगडी हा अस्सल महाराष्ट्रीय पगडीचा प्रकार आहे. पेशवाईच्या काळात जन्माला आलेली ही पगडी न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर इत्यादी विद्वान व्यक्तिंनी अंगीकारल्यामुळे प्रसिद्ध झाली. आजही पुण्यात पगडी हे मानाचे प्रतीक असून स्वागत समारंभांमध्ये पाहुण्याचं स्वागत पगडी घालून करायची प्रथा आहे. पगडीची ओळख कायम राखण्याकरिता पुणेरी पगडी संघ या गटानं तिला भौगोलिक वैशिष्ट्य म्हणून मान्यता मिळवण्यावी मागणी केली. ४ सप्टेंबर २००९ रोजी त्यांची मागणी पूर्ण झाली व पुणेरी पगडी ही बौद्धिक मालमत्ता म्हणून जाहीर झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणेरी पगडीच्या वरच्या भागाला माथा म्हटले जाते. उजव्या बाजूला असणारा उंच भाग म्हणजे कोका आणि त्याचे टोक म्हणजे चोच. ह्या भागावरच पगडीचे देखणे पण अवलंबून असते. जर हा भाग चुकला की मग पगडी ची शान शिल्लक रहात नाही. पगडी घातल्यावर हा भाग नेहमी उजव्या डोळ्यावर यायला हवा असा दाखला आहे. चोचीला असलेला गोंडा म्हणजे जरतार. पगडीच्या कडेच्या पट्टीला घेरा म्हटले जाते. घेर्‍याखाली कपाळावर येणार्‍या भागाला कमल, तर आतील भागाला गाभा म्हटले जाते.

१९व्या शतकामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी पुणेरी पगडी घालण्याची सुरुवात केली, असे म्हणतात. त्यानंतर लोकमान्य टिळक, तात्यासाहेब केळकर, दत्तो वामन पोतदार यांनीसुद्धा ही पगडी घातली. १९७३च्या घाशीराम कोतवाल ह्या नाटकानंतर पुणेरी पगडी अधिक प्रसिद्ध झाली. सेतूमाधवराव पगडी हे नियमितपणे पगडी घालणारे शेवटचे असंही सांगण्यात येतं. अर्थात, नियमित वापरात पगडी कुणी घालत नसले तरी महत्त्वाच्या समारंभांमध्ये पुणेरी पगडी आवर्जून मिरवली जाते. आणि दगडूशेठ हलवाई गणपतीलादेखील हीच पगडी घातलेली आहे.

राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर यापुढे ‘पुणेरी’ पगडी ऐवजी ‘फुले’पगडीच हवी-पवार

सामाजिक गरजांनुसार पगडीच्या बनवण्याच्या पद्धतीत व रंग, कापड आदींमध्ये फरक पडला आहे. मात्र पगडीचे मूळ स्वरूप टिकवून ठेवण्यात आले आहे. पुण्यातील मुरूडकर झेंडेवाले यांनी तीन पिढ्यांपासून पगडीची परंपरा जपली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या साच्यावरून कागदी लगद्याचा साचा तयार केला जातो आणि त्यावर कापड, स्पंज वापरून पगडी तयार केली जाते व तिला आतून अस्तर लावले जाते. रेशीम किंवा सॅटिनच्या पगडीला अधिक मागणी असते. भगवी, जांभळी, राणी कलर, मोतिया अशा अनेक रंगात पगडी तयार केली जात असली तरीही त्याच्या मूळ लाल रंगाकडेच ग्राहकांचा ओढा असल्याचं सांगण्यात येतं.