अंबाजोगाई येथील ज्येष्ठ समाजसेवक, राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते तथा मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास शालीग्रामजी लोहिया (वय ८१) यांचे शुक्रवारी रात्री १०.४५ वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मागील बारा दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी दोन वाजता मानवलोक मुख्य कार्यालय परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात प्रा. अभिजीत लोहिया,मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, मुलगी प्रा. अरूंधती पाटील, सुना, नातवंडे, जावाई असा परिवार आहे. राष्ट्रसेवादल, सानेगुरूजी आरोग्य मंडळ, सोशालिस्ट पार्टी आदी व्यापक संघटनांमध्ये राहून जनसामान्यांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांचे सत्व जपणारे व संघर्षाची प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला होती.

Kal ho naa ho
“तिथे उपस्थित असलेल्या…”, ‘त्या’ सिनेमातील शाहरुख खानच्या मृत्यूच्या सीनबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
Tragic Video! Devotee Collapses And Dies Of Heart Attack While Circumambulating Pillar At Hyderabad Temple
बिनभरवशाचं आयुष्य! देवाच्या दारात तरुणाला मृत्यूनं कवटाळलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “देवालाही दया आली नाही”
CCI probe finds Zomato, Swiggy violating competition norms
स्पर्धा आयोगाकडून चौकशीवर अंतिम निवाडा आला नसल्याचा दावा
delhi ganesh demise
दाक्षिणात्य अभिनेते दिल्ली गणेश यांचं वृद्धापकाळाने निधन, हवाई दलातील सेवेनंतर सिनेसृष्टीत केलं होतं पदार्पण; ‘अशी’ होती कारकीर्द
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून

मानवलोकच्या माध्यमातून अंबाजोगाईचे नाव त्यांनी जगाच्या नकाशावर पोहोचविले. सामान्य माणसांचा आधारवड म्हणून त्यांचा सर्वत्र लौकीक होता. मानवलोक या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी साडेचार दशकं विविध सामाजिक उपक्रम राबविले. मनस्विनी प्रकल्पाच्या माध्यमातून वंचितांना आधार दिला. गरिब व निराधारांचाही ते आधार होते. बचतगटाच्या चळवळीतून त्यांनी संस्थेच्या माध्यमातून गरीब महिलांना त्यांच्या घरपोच कर्ज उपलब्ध करून दिले. अनेक महिला आज आत्मनिर्भर झाल्या आहेत.