कर्नाटकात भाजपाचा दारुण पराभव झाल्यानंतर विरोधकांनी जल्लोष केला. तसंच, हा विजय काँग्रेसचा नसून विरोधकांचा असल्याचंही संजय राऊत म्हणाले होते. यावरून भाजपा नेते नितेश राणे यांनी राऊतांवर टीका केली आहे. तसंच, नाना पटोलेंनाही प्रश्न विचारला आहे. नितेश राणे आज माध्यमांशी बोलत होते.
नितेश राणे म्हणाले की, “मी पहिल्या दिवसापासून बोलतोय, हा महाविकास आघाडीमध्ये शकुनीमामा, नारायण मुणींचं किरदार करतोय. पूर्ण दिवस काड्या लावायच्या. महाविकास आघाडीत भाडणं लावायचे आणि अहंकार कसा दुखवायचा हा एककलमी कार्यक्रम या संजय राजाराम राऊतचा दिसतोय. देशभरात काँग्रेसबद्दल बोललं जातं. पण हा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या बाजूला बसून हा काँग्रेसचा विजय नाही, विरोधकांचा विजय आहे, असल्याचं बोलतोय. हा अपमान नाना पटोलेंना मान्य आहे का, याचं उत्तर द्यावं, असंही नितेश राणे पुढे म्हणाले.
हेही वाचा >> शिंदे सरकारविरोधातील वक्तव्यामुळे गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी पहिल्यांदाच बोलले संजय राऊत, म्हणाले…
“तुमच्या दरबाराताली छोट्या मोठ्या नेत्यांमुळे आज तुमची अवस्था मुख्य खुर्चीवरून सोफ्यावर आली आहे. दरबारातील सरदार म्हणून महाविकास आघाडीत स्थान आलं आहे. एका फोटोत तर महाविकास आघाडच्या बाजूला बसले होते. उद्धवजींनी आठवण करायला पाहिजे, भाजपासोबत असताना तुम्हाला काय सन्मान मिळायचा. किती इज्जत मिळायची. जागा वाटपाच्या चर्चेत भाजपा राष्ट्रीय नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरे कधीतरी जायचा सुभाष नेत्यांसोबत. मोठ्या नेत्यांसोबत चर्चा करायला पाठवताना कोणाला पाठवायचं तर वयाने लहान असलेल्या मुलाला पाठवायचं. म्हणजे, आज परिस्थिती किती बदलली आहे. तुम्ही संजय राऊतांच्या नादी लागलात आज तुम्हाला सोफ्यावर आणून बसवलं आहे. कुठे वज्रमूठ सभेत मुख्य खूर्चीपासून सुरू झालेला प्रवास सोफ्यावर येऊन थांबला आहे. बाळासाहेबांचा रुबाब काय होता, पण आता उद्धव ठाकरेंची अवस्था महाविकास आघाडीत काय करून ठेवली आहे”, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.