वाई : छत्रपतींच्या घराण्याबद्दल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केल्याचे पडसाद आज सर्वत्र उमटले. साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रात संजय राऊत यांच्या वक्तव्याला कुणीही फारसे महत्त्व देत नाही. छत्रपतींच्या घराण्यातील वंशजांकडे पुरावे मागणाऱ्या या व्यक्तीला जनताच उत्तर देईल, अशा शब्दात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले.
पुरावे मागणाऱ्या व्यक्तीला महत्त्व देत नाही – शिवेंद्रसिंहराजे
छत्रपतींच्या घराण्याबद्दल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केल्याचे पडसाद आज सर्वत्र उमटले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 05-03-2023 at 00:02 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Does not value the person asking for evidence shivendrasinghraje ysh