मोदींच्या कार्यकाळात २००२ मधील जातीय दंगलीत काँग्रेस खासदारासह अनेकांना जिवंत जाळण्यात आले. त्यांची गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी ते विसरले. मृतांच्या कुटूंबाचे त्यांना सांत्वन करण्याचे धर्य सुध्दा लाभले नाही. अशा कटकारस्थानी संधीसाधू भाजप नेत्याचे स्वप्न हाणून पाडा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर सभेत केले.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राँका व पीरिपा आघाडीचे उमेदवार अॅड. शिवाजीराव मोघे यांच्या निवडणूक प्रचारार्थ यांची रविवारी दुपारी ३ वाजता मंगरुळपीर येथे त्यांची जाहीर सभा झाली. गुजरातचा खरा विकास काँग्रेसच्या राजवटीतच झाला, असे सांगून मुख्यमंत्री अमरसिंह चौधरी, माधवसिंग सोलंकी, चिमनभाई पटेल यांनी विकास साध्य केला. त्यामुळे विकासाचे खरे श्रेय काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनाच जाते.
शरद पवार यांचे मंगरुळपीरला हेलिकॉप्टरने आगमन झाले. आपण कृषीमंत्री असतांना शेतकऱ्यांचे हित जोपासले. युपीए सरकारने शेतकऱ्यांसाठी मदतीचा महत्वपूर्ण पॅकेज जाहीर केला, असेही त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांनी २५ मिनिटांच्या भाषणात या मतदारसंघाचे उमेदवार अॅड. शिवाजीराव मोघे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
रखरखत्या उन्हातही शरद पवार म्हणून लोकांनी सभास्थळी गर्दी केली होती. याप्रसंगी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक, माजी मंत्री सुभाष ठाकरे, आमदार हरीभाऊ राठोड, आमदार डहाके, अनंतकुमार पाटील, राकाँ नेते ख्वाजा बेग, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॉ.मोहम्मद नदीम, वजाहत मिर्झा आदि प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.