शबरीमाला मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश देता कामा नये, असा एकमताने ठराव अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पाच दिवसीय राष्ट्रीय महोत्सवात मंजूर करण्यात आला आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी गोविंद कुलकर्णी म्हणाले की, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पाच दिवसीय राष्ट्रीय महोत्सवात पाच ठराव करण्यात आले. त्यामध्ये राम मंदिर प्रश्न सामोपचाराने सोडवून सरकारने अयोध्येत भव्य राम मंदिर उभारावे. शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देऊ नये. ब्राह्मण समाजाला आरक्षण देण्याआधी संरक्षण द्यावे, काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन त्यांच्या मूळ गावी करण्यात यावे, आणि आरक्षणाचे योग्य ते पुनर्मूल्यांकन केलं जावं अशाप्रकारचे पाच ठराव मंजूर करण्यात आले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont give entry to women in sabarimala mandir demands bramhan mahasangh
Show comments