Jayant Patil About Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (शरद पवार) हे दोन्ही नेते त्यांच्या खुमासदार भाषण शैलीसाठी ओळखले जातात. हे दोन्ही नेते बोलत असताना समोर बसलेल्यांनाही उत्सुकता असते की, ते पुढे काय बोलणार. अशात आज इस्लमापूरमधील राजारामबापू इन्स्टिट्यूटच्या एका कार्यक्रमासाठी गडकरी आणि पाटील एकाच व्यासपीठावर आले होते. गडकरी आणि पाटील कार्यक्रमासाठी एकत्र आल्याने जयंत पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. दरम्यान जयंत पाटील यांनी, “आता गडकरी साहेब राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा बातम्या करू नका”, म्हणत पत्रकारांना टोला लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यापूर्वी महायुतीच्या काही नेत्यांनी जयंत पाटील लवकरच महायुती सरकारमध्ये सहभागी होतील, त्यांच्यासाठी मंत्रिमंडळात एक जागा रिक्त ठेवण्यात आली आहे, असे दावे केले होते. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या इस्मामपूर दौऱ्यामुळे याबाबत राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. असे असले तरी जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या (शरद पवार) नेत्यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत.

काय म्हणाले जयंत पाटील?

या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील म्हणाले, “गडकरी साहेबांना सहा वाजून दहा मिनिटांनी निघायचे आहे. त्यामुळे मी फार मोठे भाषण करणार नाही. गडकरी साहेबांनी आमच्या प्रगतीशील संस्थेला भेट देत चांगला प्रतिसाद दिला. आमच्या पत्रकारांना एकच विनंती आहे की, आता गडकरी साहेब राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या करू नका. तुम्ही कशाची बातमी करता त्यावर पत्रकारितेचा दर्जा ठरतो. पत्रकारांनी एक बातमी केली आणि त्याच्यावरून देशभरातील मोठमोठ्या चिंतन करणारी लोकं पण बातम्या तयार करायला लागली, याचे मला शल्य वाटते. आज गडकरी साहेब आले आहेत. दोन वेगवेगळ्या पक्षांची माणसं एकत्र येऊच शकत नाही अशी धारणा ज्या पत्रकारांची झाली आहे, त्याबद्दल न बोललेलेच बरे.”

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (सोमवारी) सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि व्यायामशाळेचे उद्घाटन केले. या कार्यक्रमासाठी गडकरी यांच्यासह राजकीय वर्तुळातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही महाराष्ट्रातील पहिली संस्था आहे, ज्यांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत “ट्विनिंग प्रोग्राम” सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. सध्या, संस्थेने जगभरातील २६ विद्यापीठांशी करार केले आहेत.