घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर १२० प्रकाशकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात लवकरच बठक घेतली जाईल, प्रकाशकांनीही नफा-तोटय़ापलीकडे जाऊन पाहिले पाहिजे, असे मत अखिल भारतीय मराठी सहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
संत नामदेवांची जन्मभूमी नर्सी (नामदेव) येथे दर्शनासाठी मोरे आले होते. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार बठक घेतली. स्वागताध्यक्ष भारत देसरडा या वेळी उपस्थित होते. भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, याचे समर्थन करून मोरे म्हणाले की, लेखनामुळे हा पुरस्कार त्यांना मिळाला. भूमिका व लेखन यात फरक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. बेळगाव नाटय़ संमेलनावर सरकारने टाकलेले र्निबध म्हणजे ब्रिटिशकालीन र्निबध असल्याचा आरोप त्यांनी केला. घुमान साहित्य संमेलन विशिष्ट दर्जाचे असेल. घुमान हे राष्ट्रीय तीर्थक्षेत्र घोषित व्हावे. सातशे वर्षांपूर्वी संत नामदेवांनी तेथे भागवत धर्माची पताका फडकावली. नर्सी हे त्यांचे जन्मस्थान असल्यामुळे या भूमीबद्दल अत्यंत आदर आहे. राज्य सरकारने याची दखल घेतली पाहिजे.
इंग्रजी भाषेच्या शाळांमुळे मराठी शाळांवर अन्याय होत आहे का, असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, अस्मिता व अस्तित्व या दोन वेगळ्या बाजू असून मराठी भाषेबद्दल मराठी माणसाला अस्मिता असलीच पाहिजे. परंतु इंग्रजी शिकत असताना मराठीच्या अस्तित्वावर गदा येणार नाही, या साठी मराठी भाषा सक्षम झाली पाहिजे. ही एकटय़ा सरकारची जबाबदारी नसून मराठी माणसांचीसुद्धा असल्याचे ते म्हणाले. फेसबुक, सामाजिक संकेतस्थळ हे साहित्य नसून तंत्रज्ञान आहे. तंत्रज्ञान साहित्याची जागा कधीच घेऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.
घुमान साहित्य संमेलन अखिल भारतीय स्तरावर महत्त्वाचे आहे. साहित्य संमेलन हे समाज, भाषा, साहित्य, संस्कृती याचे प्रतिनिधित्व करते. यंदाच्या संमेलनामुळे मराठी माणसाची भाषा िहदी, पंजाबी व इतर भाषांशी जोडली जाणार आहे. खऱ्या अर्थाने भाषेला अांतरभारतीय स्वरूप मिळणार आहे. या पाश्र्वभूमीवर प्रकाशकांनी संमेलनावर बहिष्कार टाकण्याचा दिलेला इशारा मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. मराठी भाषेची सेवा करणाऱ्या प्रकाशकांशिवाय साहित्य व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे ते संमेलनाला निश्चितच येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा