पावसाचा जोर अगदीच ओसरल्याने कोयना धरणातील पाण्याची आवकही घटल्याने धरणातून कोयना नदीपात्रात करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग टप्याटप्याने कमी करत तो पूर्णत: बंद करण्यात आला. गेले दहा दिवस धरणाचे ६ वक्र दरवाजे फुटा, दीड फुटांवर उचलून कोयना नदीत पाण्याचा  विसर्ग करण्यात येत होता. रविवारी दिवसभर धरणक्षेत्रात ४ मि. मी. पावसाची नोंद झाली.
सायंकाळी ६ वाजता कोयना जलसागराची पाणीपातळी २,१६२ फूट ७ इंच राहताना, पाणीसाठा १०४.०५ (९८.८६ टक्के) आहे. दरम्यान, कराड व पाटण तालुक्यातही पावसाने उघडीप घेतली आहे. कोयना धरणक्षेत्रात ४,९५९ म्हणजेच एकूण सरासरीच्या ९९.१८ टक्के पाऊस झाला आहे. पाणलोटातील पाथरपूंज येथे सर्वाधिक ६,६३६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, बहुतांश प्रकल्प भरून वाहिल्याने शेतकऱ्यासह सामान्य जनतेत समाधानाचे वातावरण आहे.

Story img Loader