जलसंपदा विभाग वर्षांनुवष्रे राष्ट्रवादीच्या ताब्यात, प्रकल्पाची कामे मिळविणाऱ्या ठेकेदारांची लक्षणीय संख्या याच पक्षातील. अन्याय झाला म्हणून आता गलका करणारेही तेच, असे चित्र सध्या मराठवाडय़ात आहे!
निधीच्या वाटय़ात नि वाटपातही दुजाभाव करणारी राष्ट्रवादीच आता श्वेतपत्रिकेनंतर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊ पाहत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे अजित पवार प्रादेशिक अन्यायाच्या तापलेल्या तव्यावर सहीसलामत सुटतील काय, अशी चर्चाही रंगू लागली आहे.
दरम्यान, श्वेतपत्रिकेमुळे मराठवाडय़ातील सिंचन प्रकल्पांच्या निर्माण झालेल्या प्रश्नांवर आंदोलनाच्या तयारीत असणाऱ्या नेत्यांनी आता राज्यपालांची भेट घेण्याचे ठरविले आहे. मराठवाडय़ाला निधी देताना जलसंपदा विभागाने नेहमीच दुजाभाव केला. कृष्णा-मराठवाडा प्रकल्प मंजूर करण्यासाठी मराठवाडय़ातील नेत्यांना बराच संघर्ष करावा लागला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हा प्रकल्प मंजूर करून घेण्यासाठी त्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली. प्रकल्प मंजूर झाला खरा, परंतु त्यासाठी तरतूद मात्र तुटपुंजीच राहिली. परिणामी झालेली कामे, त्यातील गरव्यवहार तर चर्चेतदेखील आले नाहीत. आता स्थिती अशी आहे, की मराठवाडय़ाच्या हक्काच्या पाण्याचे प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा उभे राहिले.
नीरा नदीच्या पात्रात सोमनथळी व उद्धट या उच्चपातळी बंधाऱ्यांची कामे सुरू झाली. यापुढे थोडीशी तरतूद झाली तरी बारामती व फलटण तालुक्यांतील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकतो. म्हणजे निधी मराठवाडय़ाच्या नावावर नि फायदा पश्चिम महाराष्ट्राचा, असे चित्र आहे.
नीरा नदीच्या पात्रातील बॅरेजेसमध्ये भीम स्थिरीकरणातून पाणी आणायचे, ते एका बोगद्याद्वारे उजनी धरणाच्या जलाशयात सोडायचे. नंतर २५ टीएमसी पाणी मराठवाडय़ाला द्यायचे, असा प्रकल्प आहे. यातील बोगद्याच्या कामाच्या निविदाही निघाल्या. पण, काम पुढे सरकले नाही. परिणामी बॅरेजेसमध्ये पाणी अडले, की बारामती व फलटणला ते वापरता येणे सहज शक्य आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा