सांगली : येणारी लोकसभा निवडणूक आपण लढविणार असून याबाबत कोणत्या पक्षाकडून लढविणार की अपक्ष लढविणार याबाबतचा निर्णय योग्यवेळी जाहीर केला जाईल असे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी बहुतेक सर्वच राजकीय पक्षांनी आपल्याशी संपर्क साधला आहे. मात्र अद्याप आपण कोणत्याही राजकीय पक्षाला उमेदवारी स्वीकारण्यासाठी शब्द दिलेला नाही. सध्या आपण जिल्ह्यात रक्तदान चळवळीसाठी कार्यरत असून आजअखेर जिल्ह्यात गावोगावी रक्तदान शिबीराचे संयोजन करून सुमारे १२ हजार रक्तबाटल्या संकलित केल्या आहेत. पुढील महिन्यात भारतीय सैन्य दलासाठी रक्तदान शिबीराचे दिल्लीत आयोजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-संघर्षाच्या वाटेवर नेऊ नका अन् पुन्हा आगीशी खेळू नका; मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा

रक्तदान चळवळीसाठी गावोगावी संपर्क साधत असताना अनेक कार्यकर्ते लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आग्रह धरत असून त्याला आपलाही सकारात्मक प्रतिसाद असला तरी कोणत्या राजकीय पक्षाची उमेदवारी घ्यायची की अपक्ष मैदानात उतरायचे याचा निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.