शनिवारी बेपत्ता झालेल्या तालुक्यातील मोराणे येथील शाळकरी विद्यार्थ्यांचा मृतदेह रविवारी दुपारी गटारालगतच्या खड्डय़ात आढळून आला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मोराणे येथील विवेक अशोक पाटील (१५) हा शनिवारी सायंकाळी बेपत्ता झाला होता. खेळण्यासाठी म्हणून घराबाहेर पडलेला विवेक उशिरापर्यंत घरी परतलाच नाही. सर्वदूर शोधाशोध करूनही रात्री उशिरापर्यंत तो सापडला नाही. त्याचा शोध सुरू असतानाच गावातून पांझरा नदीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगतच्या गटाराजवळील खड्डय़ात विवेकचा मृतदेह आढळला. सांडपाण्याच्या डबक्यातील मृतदेह पाहून ग्रामस्थ संतप्त झाले. शव विच्छेदनात विवेकचा गळा आणि गुप्तांगाला इजा झालेली आढळून आले. प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूनंतर खुनाचा गुन्हा दाखल करून तालुका पोलिसांनी चौघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Story img Loader