भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून अभिवादन केलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.मात्र, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जयंत पाटील यांनी वेगळं माध्यम निवडलं आहे. जयंत पाटील यांनी बाबासाहेबांना पत्र लिहून अभिवादन केलं आहे. जयंत पाटील यांनी स्वःहस्ताक्षरात लिहिलेलं पत्र ट्विट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयंत पाटील यांनी बाबासाहेबांना लिहिलेलं पत्र…

प्रिय बाबासाहेब,

देशभरातील कोरोनाचे संकट कमी झाले नसल्याने यंदा आम्ही घरूनच आपल्याला अभिवादन करत आहोत.तुम्ही घालून दिलेल्या विचारांचं आजही आम्ही पालन करत आहोत. म्हणून देश हितासाठी आपल्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याच्या सरकारच्या आवाहनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आमचे सरकार संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित आहे. इथल्या रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी, उपेक्षित, वंचितांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कार्यरत राहू. महाराष्ट्राचा वारसा असलेल्या पुरोगामी विचारांना तडा न जाऊ देता समता, न्याय, बंधुता या मूल्यांचे आम्ही रक्षण करू.

चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे, इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील याचा मला विश्वास आहे. महापरिनिर्वाण दिनी तुम्हाला विनम्र अभिवादन!

आपला,
जयंत पाटील</p>

मुख्यमंत्री, राज्यपालांनीही केलं अभिवादन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतर मंत्र्यांनी व राजकीय नेत्यांनी सकाळी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या लोकराज्य मासिकाचं प्रकाशनही करण्यात आलं.