भारताने राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी स्वीकारली. अंगीकृत केली, त्या दिवसाचे औचित्य साधून ६ डिसेंबपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम जनजागृती अभियान राबविण्यात निर्णय घेतला आहे.
सदर अभियान कालावधीमध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाबाबत जनजागृती करणे, पाणलोटविषयक कामे जनमानसात रुढ करणे, लोकांचा सहभाग वाढविणे, जलसंधारण कामांना अधिक गती देणे, खर्चाच्या कामांना अधिक गती देणे इत्यादी विषयांबाबत कार्यशाळा, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यांचे आयोजन होणार आहे.
सन २००९-२०१० मध्ये महाड व पोलादपूर व सन २०१०-११ मध्ये महाड व कर्जत या तालुक्यांचा एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम शासनाने मंजूर केला आहे. सदर अभियानास संबंधित तालुक्यातील ग्रामस्थांनी तसेच तालुकास्तरीय अभियानामध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यक्रम यशस्वीपणे राबवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी केले आहे.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा