पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता व ज्येष्ठ प्राचार्य डॉ. ए. बा. ब्राह्मणकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त येथील जुना गंगापूर नाक्यावरील इंद्रप्रस्थ सभागृहात शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी ‘आनंदयात्री ज्ञानतपस्वी डॉ. ए. बा. ब्राह्मणकर गौरव ग्रंथ’ प्रकाशित केला जाणार आहे.
गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुकाराम दिघोळे, मुंबईच्या अ‍ॅस्पी ग्रुपचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक किरणभाई पटेल, गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी, पुण्याच्या बीएमसीसीचे माजी प्राचार्य डॉ. चिं. ग. वैद्य हेही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. डॉ. के. आर. शिंपी, संजय ब्राम्हणकर, प्रा. बी. जे. शेवाळे आदींनी केले आहे.

Story img Loader