महाड येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांचा इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ पेडिआट्रिक्स आणि इंडियन मेडिकल असोसिएशन या संस्थांच्या वतीने नुकताच गौरव करण्यात आला. बालरोगतज्ज्ञांचे विभागीय अधिवेशन नुकतेच परभणी येथे पार पडले. या अधिवेशनाला डॉ. दाभाडकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. डॉ. दाभाडकर हे गेली अनेक वर्षे इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ पेडिआट्रिक्स या संस्थेशी संलग्न आहेत. ग्रामीण भागात काम करून त्यांनी राज्यातून संस्थेचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करतानाच त्यांनी मुलांच्या आत्महत्या आणि त्यामागची कारणे यासारख्या संवेदनशील विषयावर संशोधन आणि प्रबोधन केले आहे. ‘चला, मुलांना घडवू या’ आणि ‘सुजाण पालकत्व’ यासारखे उपक्रम राबवून राज्यभरात जनजागृती केली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना यापूर्वी पेडिया टेरेसा पुरस्कार, डॉ. सुरेश नाडकर्णी पुरस्कार, महाडचा जीवनगौरव पुरस्कार आणि फेलो ऑफ इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ पेडिआट्रिक्स या पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.
त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन दोन्ही संस्थांच्या वतीने डॉ. दाभाडकर यांचा गौरव करण्यात आला. या अधिवेशनात ६०० बालरोगतज्ज्ञ सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा