सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर नात्यांमध्ये विसंवाद निर्माण करतो आहे..डॉ. जालिंदर सुपेकर विशेष पोलीस महानिरीक्षक आजकाल प्रत्येक व्यक्ती मोबाईलचा वापर करते. मोबाईल हेच जीवन असे चित्र निर्माण झाले आहे. मोबाईल पासून थोडा वेळ जरी आपण दूर राहिलो तरी दखील अस्वस्थ वाटते. आणि या मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियाचा प्रत्येक जण आज वापर करत आहे. मात्र यामुळे नात्यांमध्ये व दुरावा निर्माण होत आहे. असे प्रतिपादन पोलीस महानिरीक्षक कारागृह, महाराष्ट्र राज्य, पुणे’चे डॉ. जालिंदर दत्तात्रय सुपेकर त्यांनी कर्जत येथे बोलताना सांगितले. कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयामध्ये शारदाबाई पवार सभागृह येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले.

.’आपला पाहिला सन्मान आई वडिलांना दिला पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे. संघर्ष करण्याची तयारी ठेवली तर यश मिळते. आवडत्या क्षेत्रात मार्गक्रमण करताना अपयश आले तरी ताणतणाव न घेता निर्णयाप्रत पोहोचण्यासाठी प्रयत्न करा’ असे आवाहन विशेष ‘पोलीस महानिरीक्षक कारागृह, महाराष्ट्र राज्य पुणे’चे डॉ. जालिंदर दत्तात्रय सुपेकर यांनी व्यक्त केले. दादा पाटील महाविद्यालय येथे बोलताना म्हणाले दादा पाटील महाविद्यालयामध्ये कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. या महोत्सवाची सांगता वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाने झाली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके म्हणाले की, प्रेम ही भावना जीवनाला आनंद देणारी असते. प्रेमाने माणसे जोडता आली पाहिजेत. दादा पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी हे गुणवत्तेतील हिरे आहेत. मारुती जगतापसह अनेक विद्यार्थी उद्योग व्यवसायात यशस्वी झाले आहेत. सुधाकर सुपेकर यांच्या मार्गदर्शनामुळे कर्जत तालुक्याला अनेक क्लासवन अधिकारी मिळाले. आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. संजय निंबाळकर, उद्योजक भाऊसाहेब जंजिरे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे कार्याध्यक्ष डॉ. संजय ठुबे, राजेंद्र काळोखे यांचा तसेच पठारवाडी ग्रामस्थांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये४ विविध परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. एनसीसी विभागातील छात्रांच्या राष्ट्र, राज्य पातळीवरील निवडीबद्दल व विविध स्पर्धांमधील सहभागाबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. जिमखाना विभागातील विविध खेळाडूंनी केलेल्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक विभागाअंतर्गत राज्य, विद्यापीठ व विभागीय पातळीवरती संपन्न झालेल्या निबंध, वक्तृत्व, चित्रकला, संगीत , गीतगायन, मेहंदी, एकपात्री, मूकनाट्य, नाट्यलेखन स्पर्धा, वेशभूषा, रांगोळी, विविध फनी गेम्स, रेड रिबीन आयोजित जनजागृती नाट्य स्पर्धा, निवडणूक साक्षरता मंडळ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा यामध्ये मौल्यवान भूमिका निभावणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकामध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी तसेच विद्यार्थ्यांच्या पाठीवरती कौतुकाच्या शाबासकीने उमेद निर्माण व्हावी यासाठी कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील ब्रँड ठरावा असे महाविद्यालय गुणात्मक व रचनात्मक झेप घेत असल्याचे नमूद केले.

याप्रसंगी क्रीडा विभागातील पारितोषिकांचे वाचन प्रा. पवन कडू यांनी तर एन.सी.सी., सांस्कृतिक, शैक्षणिक व संशोधन विभागातील पारितोषिकांचे वाचन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. प्रमोद परदेशी यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रतिमा पवार, डॉ. भारती काळे, प्रा. राम काळे, प्रा. स्वप्निल म्हस्के यांनी केले. प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन जिमखाना विभागाचे डॉ. संतोष भुजबळ, क्रीडा शिक्षक प्रा. पवन कडू, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. प्रमोद परदेशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

Story img Loader