इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अलिबाग शाखेच्या अध्यक्षा डॉ. मेघा घाटे यांना अखिल भारतीय (बेस्ट प्रेसिडंट) पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अखिल भारतीय वार्षिक ट्रमकॉन २०१२ या अधिवेशनात हा पुरस्कार कन्याकुमारी येथे २६ डिसेंबरला देण्यात आला. तामिळनाडूचे आरोग्यमंत्री डॉ. व्ही. एस. विजय, तामिळनाडूचे वनसंरक्षणमंत्री थिरू के. टी. पटचैमल, तसेच फादर ऑफ आय. एम. ए. डॉ. एन. अप्पाराव यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्रातून दोनच महिला डॉक्टरांची अखिल भारतीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. त्यामध्ये अलिबागच्या डॉ. मेघा घाटे यांचा समावेश आहे. आय. एम. ए. अलिबाग शाखेच्या तीन वर्षे सर्व पदाधिकारी या महिला आहेत. या शाखेच्या अध्यक्षा डॉ. मेघा घाटे आहेत. सन २०११चा बेस्ट स्मॉल ब्रांच हा महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार पण आय. एम. ए. अलिबागला मिळाला होता. तसेच डॉ. मेघा घाटे यांना नुकताच २०१२चा राज्यस्तरीय बेस्ट प्रेसिडंट हा पुरस्कार देण्यात आला होता. सलग दुसऱ्यांदा हा बहुमान डॉ. मेघा घाटे यांना मिळाला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. मेघा घाटे म्हणाल्या की, असोसिएशनच्या सर्व डॉक्टर सदस्यांच्या सहकार्यामुळे अलिबागमधील सर्व नागरिकांच्या व सर्व आप्तेष्टांच्या सदिच्छांमुळे, तसेच अनेक वर्षे निरपेक्ष भावनेने शाळा-कॉलेजातील मुलींसाठी व महिला मंडळांसाठी वेळोवेळी घेतलेली शिबिरे व लेक्चर्स, प्रबोधनकारक उपक्रम यामुळे सर्व समाजाच्या आशीर्वादाचे हे फळ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा