मागील दोन वर्षांपासून करोना या जागतिक महामारीने सर्वांचे जीवनमान बदलले आहे. त्यातच मास्क हा दैनंदिन आयुष्याचा भाग बनलेला आहे. अशा वेळी ठाकरे सरकार मात्र मास्क हद्दपार करण्याच्या विचारात आहे. त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चाही करण्यात आली. दरम्यान मास्क सक्तीचा नको तर मास्क इच्छेनुसार लोकांनी घालावा त्याचा जास्त फायदा होईल, असं मत डॉ. रवी गोडसे यांनी व्यक्त केलं आहे. मास्क आणखी दोन आठवडे वापरावे नंतर आपल्याला मुक्ती मिळणार आहे असंही मत डॉ. रवी गोडसे यांनी व्यक्त केलं आहे.
हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा