वाई:मराठा आरक्षणाच्या मुद्यावर जालना येथे झालेल्या लाठीहल्ला प्रकरणाचे संपूर्ण राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत . या पाश्र्वभूमीवर भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंढे यांनी मराठा आरक्षणाचा मसुदा व्यवस्थित नसल्याने ते आरक्षण न्यायालयात टिकले नाही असा राजकीय टोला पंकजा यांनी लगावला आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे या सध्या शिवशक्ती परिक्रमा करत आहेत.शिखर शिंगणापूर येथे त्यांनी शंभू महादेवाला अभिषेक करून पूजा केली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले,आमदार माधुरीताई मिसाळ उपस्थित होत्या. मंदिर समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “निजामकालीन नोंदी असणाऱ्यांना कुणबी दाखले देणार”, मुख्यमंत्र्यांची घोषणा; जरांगे पाटील उपोषण मागे घेणार? म्हणाले…

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या,मराठा आरक्षणाचा मसुदा व्यवस्थित मांडण्याचे काम संबंधित कमिटीने व्यवस्थित केले नाही.कमिटीचा मसुदा निट असता तर मराठा समाजाला १०० टक्के आरक्षण मिळालं असतं. मसुदा ( ड्राफ्ट) निट नसल्याने कोर्टात आरक्षण टिकलं नाही . आज शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाचे दर्शन घेऊन त्याची पूजा केली आहे यावेळी माझे मोठे बंधू खासदार उदयनराजे भोसले यांनी मला तलवार भेट दिली आहे त्यांनी एका भगिनीचा सन्मान केला आहे आणि लढण्यासाठी तलवार भेट दिली आहे. समाजाप्रती त्यांची खूप मोठी तळमळ आहे असे पंकजा मुंढे म्हणाल्या.माझी शिवशक्ती परिक्रमा दौरा सुरु आहे. माझं दोन शक्ती पिठांच दर्शन झालं असुन दोन‌ जोर्तिंलिंगांच दर्शन झालंय. मला लोकांना भेटण्याची तिव्र इच्छा होती आणि दर्शनाची सुद्धा खुप इच्छा होती. माझं स्वागत साताऱ्यात मोठ्या उत्साहात स्वागत झालंं. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Draft of maratha reservation was not good says pankaja mundhe zws
Show comments