यक्षगान नृत्य नाटय़ प्रशिक्षण शिबिरातून कलासक्त व्यक्ती बनविण्याच्या नाटय़दर्शन सावंतवाडीच्या शिबिरात सुमारे ३२ जणांनी सहभाग घेतला आहे. या यक्षगान शिबिरातून कलाकार म्हणून प्रशिक्षण देण्यासाठी तंजावरचे प्रशिक्षक दाखल झाले आहेत. या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.  नाटय़दर्शन सावंतवाडीने नगर परिषदेच्या सहकार्याने १७ ते २४ नोव्हेंबर य कालावधीत श्रीमंत शिवरामराजे खेमसावंत भोसले वस्तुसंग्रहालय व कला दालनात प्रशिक्षण सुरू केले आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नाटय़दर्शनचे दिनकर धाटणकर, कार्यवाह सचिन धोपेश्वरकर, रमेश कासकर, भरत गावडे, प्रा. विजय फातर्पेकर, जनार्दन पोकळे, मंदा फातर्पेकर, प्रा. सुभाष गोवेकर, विनया वाड, प्रसन्न कोरे, जयवंत चिटणीस, अनिल गावडे, नगरसेवक देवेंद्र टेमकर आदी उपस्थित होते.
सावंतवाडीच्या सांस्कृतिक वातावरणाचे जतन व संवर्धन करण्यासाठी नगर परिषद कायमच पुढाकार घेईल. नगर परिषदेने कायमच सांस्कृतिक ठेवा जोपासण्यासाठी पुढाकार घेतला आहे. संस्था व कलाकारांचा सन्मान आम्ही कायमच ठेवू, असा विश्वास नगराध्यक्ष साळगावकर यांनी व्यक्त केला.
यावेळी गणेशवंदना नृत्याने स्वागत केल्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले. या शिबिरात स्वर, लय, सूर, नृत्य या सर्व अंगांना स्पर्श करणारे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. कलासक्त व्यक्ती बनविण्याचा शिबिरातून प्रयत्न होईल असे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी यक्षगान प्रशिक्षण देण्यासाठी प्राचार्य संजीव सुवर्णा, सतीश केरलया धारावळी, देवतासराव कुडती, प्रतीशकुमार ब्रह्मावत आदींनी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. नाटय़दर्शन सावंतवाडीच्या जुन्या जाणत्या रंगकर्मीसह नवीन कार्यकर्त्यांनीही या शिबिराच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा