मराठा आंदोलनाचा चेहरा असलेले नेते मनोज जरांगेंवर पाळत ठेवली जाते आहे का? असा प्रश्न निर्माण होतो आहे. कारण मनोज जरांगेंच्या घरावर ड्रोनने घिरट्या घातल्याची चर्चा होते आहे. सोमवारी रात्री मनोज जरांगेंच्या घरावर ड्रोनने घिरट्या घातल्या असं गावकऱ्यांनी म्हटलं आहे. ड्रोनच्या मदतीने मनोज जरांगेंच्या घराची टेहळणी केली जाते आहे असं गावकऱ्यांनी म्हटलं आहे. सगेसोयऱ्यांच्या अंंमलबजावणीसह मराठा आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. त्यासाठी त्यांनी बेमुदत उपोषण सुरुही केलं होतं. मात्र त्यांनी ते मागे घेतलं आहे. आता त्यांनी आमच्या ममागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर विधानसभा निवडणुकीत एक एकेला नाव घेऊन पाडणार असल्याचं म्हटलं आहे. अशात एक ड्रोन त्यांच्या घराभोवती घिरट्या घालत असल्याची चर्चा आहे.

हे पण वाचा- पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…

pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…
Manoj Jarange patil
“ओबीसी नेते नालायक असूनही…”, मनोज जरांगेंचा हल्लाबोल; मराठा तरुणांना आवाहन करत म्हणाले…
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
Manoj Jarange
मनोज जरांगेंचं आवाहन, “मी एकटा पडलो आहे आणि मराठा जात संकटात, तेव्हा…”
dhananjay munde pankaja munde beed news
बहिणीच्या पराभवावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “या सगळ्या पराभवाची जबाबदारी…”
Uddhav Thackeray Express Photo By Ganesh shirsekar (1)
Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : “मला सांगा, राहुल गाधींनी कुठे हिंदुत्वाचा अपमान केला?” उद्धव ठाकरेंचा थेट सवाल; म्हणाले, “प्रभू शंकराचा फोटो दाखवण्यावर…”
Pankaja Munde
विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मला शल्य…”

नेमका प्रकार काय घडला?

सोमवारी मध्यरात्री एक ड्रोन कॅमेरा मनोज जरांगेंचा मुक्काम असलेल्या घराभोवती फिरत होता असं गावकऱ्यांनी म्हटलं आहे. यानंतर मनोज जरांगेंनी घराच्या टेरेसवर जाऊन पाहणी केली असंही गावकऱ्यांनी म्हटलं आहे. यानंतर त्यांनी सहकाऱ्यांशी चर्चाही केली. या प्रकाराबद्दल अंतरवाली सराटीचे सरपंच आणि ग्रामस्थांनी पोलिसांना तोंडी तक्रार दिली आहे. आता पोलीस घटनास्थळी येऊन पाहणी करण्याची शक्यता आहे. चार दिवसांपूर्वीच अंतरवाली सराटीत अशाचप्रकारे ड्रोन घिरट्या घालताना दिसून आल्याचंही गावकऱ्यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

मनोज जरांगेंनी ड्रोनच्या टेहळणीबाबत काय म्हटलंय?

“काय प्रकार आहे मला माहीत नाही. मला मारण्याचा अजेंडा असू शकतो, खोटे व्हिडीओ काढण्याचा अजेंडा असू शकतो. काहीही असू शकतं. मी गोरगरीब मराठ्यांसाठी लढतोय. माझ्यापासून कुणाला फायदा होऊ शकणार नाही. फायदा होणार नसेल तर मी कामाचाच नाही असं काहींना वाटू शकतं. समाज मोठा व्हायला नको मीच मोठा झालो पाहिजे असं काहींना वाटत असेल. माझ्याकडे कुठलं काहीही कपट नाही. त्यामुळे अनेकांना मी पटत नाही. मला बाजूला करण्यासाठी काही गोष्टी केल्या जात असतील. मी काही त्याला फार महत्व देत नाही. मी जे बोलायचं ते तोंडावर बोलतो. मी डाव टाकून कुणालाही संपवण्याचा प्रयत्न करत नाही. मी काड्या करणारा नाही. माझा तो स्वभावच नाही. मी कुठेही असलो तरीही अशा गोष्टींना महत्त्व देत नाही. ड्रोन वगैरे फिरायचे असतील तरीही फिरुदे काही फरक पडत नाही. आम्हाला मागे सरकणं माहीत नाही.” असं म्हणत जरांगेंनी ड्रोन प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

१३ जुलैपर्यंत सरकारला मुदत

मनोज जरांगेंनी यांनी मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या व्याख्येत बसणारे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी ८ जूनपासून आंतरवाली सराटी येथे पुन्हा बेमुदत उपोषण सुरु केलं होतं. मात्र, चार दिवसांमध्येच राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी सरकारी शिष्टमंडळाने सगेसोयऱ्यांच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला १३ जुलैपर्यंतची मुदत देत बेमुदत उपोषण स्थगित केले होते. ही मुदत संपायला आता अवघे ११ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे राज्य सरकार येत्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाबाबत काही निर्णय घेणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तसंच आज मनोज जरांगे या ड्रोनच्या प्रकाराबाबत काय बोलणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.