राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे विरोधी पक्षाकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत होती. राज्यातील अनेक तळी, विहिरी कोरडया पडल्या आहेत. पाण्याची, चाऱ्याची गंभीर स्थिती आहे.हीच बाब ध्यानात घेऊन महाराष्ट्र सरकारने २६ जिल्ह्यांतील १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. ११२ तालुक्यात गंभीर आणि ३९ तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ सरकारने जाहीर केला आहे.
जळगाव, अहमदनगर, बीड या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक दुष्काळी तालुके आहेत. कमी पाऊस, भूजल कमतरता, शेतीची स्थिती आणि पेरणीखालील क्षेत्र या बाबी ध्यानात घेऊन दुष्काळ जाहीर करण्यात आला. पुढच्या सहा महिन्यांसाठी दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळी तालुक्यांमध्ये आवश्यक उपायोजना अंमलात येणार आहेत.
पालकमंत्र्यांनी दुष्काळी भागांचा दौरा करुन त्याबाबतचा आपला अहवाल सरकारला दिल्यानंतर १८० तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती जाहीर करण्यात आली होती.