निर्यातक्षम द्राक्षांना प्रतिकिलो १०० रुपये भाव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बहुतांश भागांत दुष्काळाचे चटके बसत असताना कसमादे पट्टय़ात हंगामपूर्व (अर्ली) द्राक्षांना प्रारंभीच सरासरी १०० रुपये भाव मिळाल्याने उत्पादकांना सुखद धक्का बसला आहे. रशिया, बांगलादेश, पश्चिम बंगालमधून त्यांना मागणी आहे. संपूर्ण जिल्ह्य़ात पाणीटंचाईचे सावट असून उन्हाळ्यात त्याची झळ द्राक्षबागांनाही बसू शकते. वातावरण पोषक राहिल्याने यंदा मुबलक उत्पादन होईल; परंतु निर्यात उंचावेल की नाही, याबद्दल साशंकता आहे. जानेवारी महिन्यात निफाडसह अन्य भागातील द्राक्षे बाजारात आल्यानंतर दर काही अंशी कमी होतील.

उद्योग, व्यवसायात ‘जितका धोका पत्कराल, तितका नफा अधिक’ असे सांगितले जाते. बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांनी तेच धोरण द्राक्ष शेतीत राबविले. कधीकाळी बागलाण हा परिसर डाळिंब उत्पादनासाठी ओळखला जात होता. गारपीट, अवकाळी पाऊस आणि तेल्या रोगाच्या आक्रमणाने हे पीक हद्दपार होण्याच्या मार्गावर आले. शेतकरी अडचणीत सापडला. भौगोलिक रचना आणि वातावरणाचा ताळमेळ साधत अनेकांनी दुसरे नगदी पीक म्हणून द्राक्ष लागवडीकडे मोर्चा वळवला. मागील काही वर्षांत कसमादे पट्टय़ात द्राक्ष लागवडीत चारपटीने वाढ झाल्याची आकडेवारी आहे. चार वर्षांपूर्वी बागलाण तालुक्यात ३५० एकर क्षेत्रावर द्राक्ष पीक घेतले जात होते. डाळिंबाची जागा द्राक्षाने घेतली. या वर्षी एकटय़ा बागलाणमध्ये १६०० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. प्रयोगशील द्राक्ष उत्पादकांचा परिसर म्हणून बागलाणची जगात ओळख निर्माण झाली. बहुतांश शेतकऱ्यांनी १ जूनपासून द्राक्षांची छाटणी करून द्राक्षबाग फुलविण्याचे यशस्वी प्रयोग केले. परिसरातील गावांमधून पश्चिम बंगाल तसेच बांगलादेशचे व्यापारी शिवार खरेदी करीत आहे. हंगामपूर्व द्राक्षांचे समीकरण जुळविण्यात बागलाणचे शेतकरी यशस्वी झाले. ११० ते १२० दिवसांत हे पीक येते. युरोप, रशिया, आखाती देशात त्यांना मागणी असल्याने भावही चांगला मिळतो. बागलाण तालुक्यात थॉमसन, क्लोन-दोन, ताज गणेश, सोनाका, नाना पर्पल आदी वाणांचे द्राक्ष पीक घेतले जाते. त्यात मोसम, करंजाडी, हत्ती, कान्हेरी, गिरणा खोरे आघाडीवर आहे. रशियात मोठय़ा प्रमाणात निर्यात होत असल्याने या द्राक्षांना यंदा चांगले दर मिळाल्याचे द्राक्ष उत्पादक संघाचे विभागीय अध्यक्ष माणिकराव पाटील यांनी सांगितले. आतापर्यंतचे हवामान द्राक्षांसाठी पोषक राहिले आहे. यामुळे या हंगामात उत्पादन वाढणार आहे. निर्यातदेखील वाढेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणीची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. गतवर्षीच्या तुलनेत नोंदणी करणाऱ्यांची संख्या कमी आहे. ही मुदत संपुष्टात आल्यानंतर निर्यातीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. १५ जानेवारीनंतर अन्य तालुक्यांमधून द्राक्षे बाजारात येण्यास सुरुवात होईल. आवक वाढल्यानंतर दर कमी होतील, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

नफ्याचे समीकरण

बागलाण तालुक्यात थॉमसन, क्लोन दोन या वाणाची द्राक्षे प्रति किलो सरासरी ११० रुपये किलो दराने खरेदी केली जात आहे. यंदाच्या हंगामात प्रदीप देवरे यांच्या बागेतील द्राक्षे पहिल्यांदा बाजारात गेली. एक एकरच्या द्राक्ष बागेतून सात टन उत्पादन झाले. त्यातून सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. हंगामपूर्व द्राक्षांना महिनाभरात ११० ते ८० रुपये किलोदरम्यान भाव मिळाले. असे दर मिळवणाऱ्या शेतकऱ्याला खर्च वजा जाता एकरी अडीच ते चार लाख रुपये नफा मिळतो, असे जाणकार सांगतात.

द्राक्ष निर्यात गतवर्षीच्या तुलनेत कमी राहील असे चित्र असले तरी निर्यातीसाठी नोंदणीची मुदत डिसेंबपर्यंत आहे. अंतिम नोंदणीनंतर निर्यातीबाबत स्पष्टता होईल. पोषक हवामानामुळे या वर्षी द्राक्षाचे उत्पादन चांगले राहणार आहे.    – संजीव पडवळ (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी)