अलिबाग – गेल्या पंधरा दिवसांत रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर अंमली पदार्थांची २०० हून अधिक पाकिटे वाहून आली. पोलिसांनी मोहीम राबवत ही पाकिटे जप्त केली असली तरी या घटनामुळे सागरी सुरक्षेतील त्रृटी पुन्हा एकदा उजागर झाल्या. नौसेना, तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांचा डोळा चुकवत अंमली पदार्थ किनाऱ्यापर्यंत कसे पोहोचले, ते कोणी टाकले, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. सगळ्यात महत्त्वाचे आज अंमली पदार्थ वाहत आलेत उद्या शस्त्रात्र आणि स्फोटके आली, तर सुरक्षा यंत्रणा काय करणार, अशी भिती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

कोकणचा संमुद्र किनारा हा कायमच सागरी सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून ओळखला जातो. मुंबईला लागून असल्याने येथील सागरी सुरक्षेचे महत्त्व अधिकच वाढते. १९९२ च्या मुंबईतील बॉम्ब स्फोटांसाठी लागणारी स्फोटकं ही रायगड जिल्ह्यातील दिघी आणि शेखाडी येथे उतरवली गेली होती. नंतर अजमल कसाबने केलेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी हल्लेखोरांनी सागरी मार्गाचा अवलंब केला होता. या दोन्ही घटनांनंतर देशातील सागरी सुरक्षेतील त्रृटी प्रकर्षाने समोर आल्या होत्या. यानंतर कोकण किनारपट्टीवर सागरी पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली होती. पण तरीही किनाऱ्यांवरील सागरी सुरक्षा कवच भक्कम झाल्याचे दिसून येत नाही.

worth rs 17 lakh copper wires stolen by digging underground
चोरट्यांची शक्कल! भुयार खोदून १७ लाखांच्या तांब्याच्या तारा चोरी
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
A large stockpile of swords koyta seized in Akkalkot crime news
अक्कलकोटमध्ये तलवारी,कोयत्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
kiran samant
राजापूर विधानसभेसाठी शिंदे गटाचे किरण सामंत आणि ठाकरे गटाचे राजन साळवी यांचा उमदेवारी अर्ज दाखल
fda meswak
मुंबई: मेसवाक दंतमंजनवर एफडीएची कारवाई, ४१ लाख रुपयांचा साठा जप्त
nagpur police seized 8 lakh rupess first action during assembly election
खळबळजनक! नागपुरात आठ लाखांची रक्कम जप्त, आचारसंहिता काळातील पहिली कारवाई
Pune Rural Police arrested 21 illegal Bangladeshi nationals in Ranjangaon Industrial Colony
पिस्तुलांची तस्करी रोखण्याचे आव्हान
house owner kidnap island
पिंपरी : पर्यटनाच्या बहाण्याने नारळ पाणी विक्रेत्याकडून खंडणीसाठी घरमालकाचे विमानाने अपहरण; बेटावर डांबले

हेही वाचा – रेल्वेसाठी ज्येष्ठ नागरिकांनी अतिरिक्त १५ कोटी २६ लाख का मोजले?

गेल्या पंधरा दिवसांत रायगडच्या विविध समुद्र किनाऱ्यांवर अंमली पदार्थांची पाकिटे वाहून येण्याचे सत्र सुरू आहे. २०९ किलो वजनाची १७५ चरसची पाकिटे जिल्ह्यातील विविध किनाऱ्यांवर वाहून आली आहेत. ज्याची बाजारातील किंमत ८ कोटी ३६ लांखाच्या आसपास आहे. श्रीवर्धन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, ही पाकिटे कुठून आणि कशी आली, कोणी टाकली, हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेल नाही. या पाकिटांवर पाकिस्तान प्रिमियम क्वालिटी राईस असा उल्लेख आढळत आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमधून पाकिस्तान मार्गे हे अंमली पदार्थ आले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरक्षा यंत्रणांच्या भितीने अथवा जाणीवपूर्वक मुंबई लगतच्या किनाऱ्यांवर ही पाकिटे समुद्रात टाकली गेली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मुंबई लगतच्या परिसरात तरुण पिढीला व्यसनाधीन करण्याचा उद्देश यामागे असू शकतो. त्यामुळे या घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

सुरक्षा यंत्रणांचे डोळे चुकवत आज किनाऱ्यांवर अंमली पदार्थ वाहून आलेत. उद्या स्फोटकं आणि शस्त्रास्त्रही येऊ शकतात. त्यामुळे या घटनांना गांभीर्याने घ्यायला हवे. सुरक्षा यंत्रणांमध्ये राहिलेल्या त्रुटींचा अभ्यास करायला हवा. त्या दूर करण्याच्या दृष्टीने तातडीने पाऊले उचलायला हवीत. सागरी पोलीस, तटरक्षक आणि नौसेना, कस्टम्स यांच्यातील समन्वय वाढवायला हवा. अन्यथा अशा घटना देशासाठी अत्यंत घातक ठरू शकतात.

कुठे किती पाकिटे सापडलीत?

जीवना बंदर – ९ , मारळ बीच – ३०, सर्वे बीच – २४, कोंडीवली बीच – २८, दिवेआगर, आदगाव बीच – ४६, कोर्लई व थेरोंडा बीच – १९, आक्षी बीच – ६, नानीवली बीच – १, श्रीवर्धन बीच – १२

हेही वाचा – नागपूर : भरधाव कारची दुचाकीला धडक, युवक उड्डाण पुलावरून खाली पडला

तर गेल्या वर्षी हरिहरेश्वर येथे बोट बेवारस अवस्थेत भरकटून किनाऱ्याला लागली होती. या बोटीत, एका पेटीत अत्याधुनिक शस्त्र आणि जिवंत काढतुसे आढळून आली होती. त्यामुळे सातत्याने घडणाऱ्या या घटनांना गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. सागरी सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे, अशी मागणी किनारपट्टीवरील रहिवाशांकडून केली जात आहे.

समुद्र किनाऱ्यावर अंमली पदार्थ वाहून येण्याच्या घटना लक्षात घेऊन, जिल्ह्यातील सागरी पोलीस ठाण्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. गस्त वाढविण्याचे निर्देशही दिले आहेत. श्रीवर्धन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. – सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक.