वाई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रकृती अस्वस्थामुळे विश्रांती घेण्यासाठी साताऱ्यातील दरे या आपल्या गावी आले आहेत आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी जास्त वेळ विश्रांती घेणेच पसंत केले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दर दोन अडीच महिन्यानंतर आपल्या गावी दरे ( ता महाबळेश्वर) येथे येत असतात. सध्या मुख्यमंत्र्यांची धावपळ सुरू आहे. दररोजचे दौरे बैठका शिबिरे आदींमुळे प्रवास करावा लागत आहे .त्यांना अजिबात विश्रांती मिळत नाही. आतिश्रमाने त्यांना थकवा जाणवत आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीच्या काही तक्रारी येत आहेत .त्यामुळे आपल्या रोजच्या व्यापातून बाहेर पडून त्यांनी विश्रांतीसाठी आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवारी पुण्यातील चांदणी चौकातील नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या रस्त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमालाही ते अनुपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची तब्येत ठीक नसल्याने ते उपस्थित राहिले नाहीत असे सांगितल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत.प्रकृती बिघडल्यानंतर तात्पुरते उपचार घेऊन ते लगेच कामाला सुरुवात करतात. त्यामुळे प्रकृतीच्या तक्रारी वाढत असल्याच्या चर्चा त्यांच्या गटाच्या आमदारांमध्ये आहेत. त्याला प्रकृतीची काळजी घेण्याची वेळोवेळी विनंती केली आहे .परंतु ते दुर्लक्ष करून स्वतःला कामात गुंतवून घेतात असे त्यांच्या गटाच्या आमदाराने सांगितले. १५ ऑगस्ट नंतर त्यांच्या प्रकृतीची पूर्ण तपासणी करण्यात येणार असल्याचेही माहिती त्यांच्या निकटवर्ती यांनी आज दिली.येथे आल्यानंतर ते आपल्या शेतीला फेरफटका मारणे, शेतीत कामे करणे, गावकऱ्यांशी संवाद साधने, याबरोबरच सातारा प्रशासन प्रशासनाची जिल्ह्यातील अडीअडचणी बाबत माहिती घेणे आणि एक दिवस नागरिकांच्या भेटीसाठी देत असतात.

मात्र यावेळी त्यांनी बऱ्याच धावपळीनां फाटा दिला. यावेळी सध्या त्यांच्या गावी दरे येथे परिसरात हलका व मध्यम पाऊस सुरू आहे.ढगाळ वातावरण आणि धुके,वातावरणात गारठा आहे.ओढे आले भरून वाहत आहेत. वातावरण एकदम चांगले आहे साताऱ्यातून कास बामणोली मार्गे बोटीतून ते गावी गेले पोहोचले. मुख्यमंत्री गावी आले म्हणजे त्यांना भेटण्यासाठी साताऱ्यातील व पश्चिम महाराष्ट्रातील आमदार खासदार भेटीसाठी येत असतात .या दौऱ्यात उलट चित्र दिसले आहे.यावेळी त्यांनी जास्तीत जास्त विश्रांतीला प्राधान्य दिले आहे. शुक्रवारी साताऱ्यात आल्यानंतर शनिवारी व रविवारी त्यांनी दिवसभर विश्रांती घेतली. शनिवार तर त्यांनी झोपूनच काढला. त्यांची पालकमंत्री शंभूराजे देसाई, सातारा जावळीचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, वाईचे आमदार मकरंद पाटील, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी पोलीस अधीक्षक समीर शेख आदींनी मात्र त्यांची भेट घेतली आहे.

दौऱ्यात त्यांनी बांबू लागवड अभियानाचा शुभारंभ केला .तसेच मुख्यमंत्री यांच्या हस्ते जिल्ह्यातील ग्रामपंचायत पिंपरी येथे ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले. आज त्यांनी जनता दरबार ही घेतला मात्र नेहमीचा उत्साह या दौऱ्यात दिसला नाही