नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने ४०० पारचा नारा केला होता. संपूर्ण देशभरातून ४०० हून अधिक जागांवर निवडून येण्याचं त्यांचं उद्दीष्ट्य होतं. परंतु, त्यांची गाडी ३०० पारही होऊ शकली नाही. अनेक राज्यांमध्ये त्यांना मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रातही महायुतीला म्हणावं तसं यश मिळालं नाही. यावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. ते शेती पिक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाची बैठकीत बोलत होते.
“गेल्या १० वर्षांत मोदींनी काम केलंय. त्यांचं १० वर्षांतलं काम आम्ही पाहिलं आहे. त्यांनी घेतलेले निर्णय आम्ही पाहिले आहेत. गेल्या ६० वर्षांत जे निर्णय घेतले गेले नाहीत ते त्यांनी गेल्या १० वर्षांत घेतले. परंतु, त्यामुळे काय झालं, नरेटिव्ह सेट करताना काही ठिकाणी आम्हाला नुकसान झालं. महाराष्ट्रातही नुकसान झालं. संविधान बदलणार, आरक्षण जाणार अशा चर्चा होत्या. असं काहीच होणार नव्हतं. परंतु, ४०० पारच्या आकड्यामुळे गडबड झाली”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा > बारामतीत काका-पुतण्याची लढत? विधानसभेसाठी अजित पवारांविरोधात शरद पवार मोठा निर्णय घेणार?
शेतकऱ्यांना दुःखी ठेवून कोणीही सुखी राहणार नाही
ते पुढे म्हणाले की, “मोदींना देशाची सेवा करायची आहे. मोदींनी आपलं जीवन देशाला समर्पित केलं आहे. १० वर्षांत एकही सुट्टी न घेतलेला पंतप्रधान कोण आहे? त्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यंदा पंतप्रधान बनले. आम्ही जुने सहकारी आहोत. तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर त्यांनी सर्वातं पहिला निर्णय शेतकऱ्यांविषयी घेतला. भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतकरी अन्नदाता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुःखी ठेवून कोणीही सुखी राहू शकत नाही”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
# Live?| 11-06-2024 ?सह्याद्री अतिथीगृह
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 11, 2024
? शेती पिक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाची बैठक
https://t.co/6istfYSI0f
“आता १२ हजार शेतकऱ्यांना मिळतात. पीकविमाही सरकार भरतं. एक रुपया देऊन पीकविमा आम्ही लागू करतो. अशा अनेक योजना आम्ही शेतकऱ्यांसाठी केल्या आहेत. राज्यातील शेतकरी दुःखी नसावा म्हणून प्रयत्न करतोय”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.