छत्रपती शिवाजी महाराज, सरखले कान्होजी आंग्रे यांच्या नावाचा जयघोष करत गोनीदा तिसरे दुर्ग साहित्य संमेलनास प्रारंभ झाला. सिंधुदुर्ग शहरातून काढलेली ग्रंथदिंडी, विजयदुर्ग किल्ला रोषणाईमुळे हे दुर्ग साहित्य संमेलनास सर्वानीच दाद दिली. गोनीदा तिसरे दुर्ग साहित्य संमेलन तीन दिवसांचे आयोजन केले होते. किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे राजू परुळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या आयोजनाने हे संमेलन यशस्वी झाले.
किल्ले विजयदुर्ग या ठिकाणी ग्रंथदिंडी मिरवणुकीने आणण्यात आली. किल्ले शिवदुर्ग साहित्याचे ग्रंथ या दिंडीत होते. जयघोष व वाजतगाजत काढलेल्या या ग्रंथ मिरवणुकीत साहित्यिक व ग्रामस्थांचा सहभाग होता. ही मिरवणूक विजयदुर्ग किल्ल्यावर आली. या ग्रंथदिंडीचे स्वागत शिवदुर्ग साहित्यिक अण्णासाहेब शिरगावकर, रघुजीराजे आंग्रे, डॉ. विजय देव, वीणा देव, अभिजित बेल्हेकर आदी मान्यवरांनी केले. नंतर शिवदुर्ग साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन प्रकाश परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
विजयदुर्ग किल्ल्यावर पुरातत्त्व खात्याने किल्ले, लेण्यांचे चित्र प्रदर्शन भरविले होते. दुर्ग साहित्य संमेलनात पुरातत्त्व खात्याचा हा सहभाग इतिहासाला प्रेरणा देणारा ठरला. तसेच गोवा राज्यातील ४७ किल्ले प्रदर्शन सचिन मदगे तर कोकणातील गड व पर्यटनाचे सचित्र दर्शन घडविणारे भास्कर सरगरे यांचे चित्रदर्शन साहित्यकांचे लक्ष वेधणारे ठरले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आल्यावर रघुजी राजे आंग्रे, डॉ. विजय देव, अभिजित बेल्हेकर व दुर्ग साहित्यिकांना पुरातत्त्व खात्याचे राजन दिवेकर, सचिन मदगे, भास्कर सरगरे यांनी आपापल्या प्रदर्शनाची माहिती दिली.
विजयदुर्ग विद्युत रोषणाईने व फुलांच्या माळांनी सजला असतानाच दुर्ग साहित्य, शिवरायांची शौर्य गाथा सांगणाऱ्या चित्रप्रदर्शन व ग्रंथ प्रदर्शनाने फुलला होता. त्यामुळे दुर्ग साहित्यिक संमेलनाच्या यशस्वितेला दाद देत होते.
दुर्ग साहित्य संमेलनाला रसिकांची उत्स्फूर्त दाद
छत्रपती शिवाजी महाराज, सरखले कान्होजी आंग्रे यांच्या नावाचा जयघोष करत गोनीदा तिसरे दुर्ग साहित्य संमेलनास प्रारंभ झाला. सिंधुदुर्ग शहरातून काढलेली ग्रंथदिंडी, विजयदुर्ग किल्ला रोषणाईमुळे हे दुर्ग साहित्य संमेलनास सर्वानीच दाद दिली. गोनीदा तिसरे दुर्ग साहित्य संमेलन तीन दिवसांचे आयोजन केले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-01-2013 at 02:59 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Durg literature gathering