वाई – पंकजा मुंडे साताऱ्यातील शिंगणापूर दौऱ्यावर असताना त्यांच्या स्वागतासाठी झलेल्या गर्दीमधून चोरट्यांनी पंधरा तोळ्याचे दागिने चोरी करत लाखोंचा ऐवज लंपास केला.

पंकजा मुंडे यांचा ताफा थांबताच साताऱ्यातील लोणंद, फलटण शिखरशिंगणापूर मार्गावर कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीभोवती गर्दी केली. या गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी हातचलाखी करत अनेक नेत्यांच्या गळ्यातील चेन लंपास केल्या. यामध्ये भाजपचे डॉ. सुभाष गुळवे यांच्या गळ्यातील चार तोळ्याची सोन्याची चेन, सांगवी (ता. फलटण) येथील महादेव कदम यांच्या गळ्यातील तब्बल साडेदहा तोळ्याची चेन, पोपटराव मिंड यांच्या गळ्यातील एक तोळ्याची चेन लांबवली.

Small child seriously injured in attack by dog in Pune
पुण्यात कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; चाकणमधील घटना
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Controversy over the initials Rama written on the body of a goat
बकऱ्याच्या अंगावर लिहिलेल्या राम आद्याक्षरावरून वाद; न्यायालयात नेमके काय घडले?
Traffic jam on Ghodbunder road thane
‘ठाणेकर’ होऊन रहाण्याच्या हौसेवर कोंडीचे विरजण
satara police arrested couple for malpractice in majhi ladki bahin yojana
लाडकी बहीण’चा गैरफायदा घेणाऱ्या दाम्पत्यास अटक
dhule police arrest two for carrying swords and choppers with intention to create terror
धुळ्यात दहशतीसाठी तलवारी, चॉपरचा वापर
Vasai, child abuse, stepmother, Stepmother Brutally Assaults Children, Waliv Police Station,
वसई : सावत्र आईकडून दोन चिमुकल्यांचा अमानुष छळ; गुप्तांगाला गरम चाकूने चटके, अमानुष मारहाण
Kalyan, Khadakpada Police Station, School Security, CCTV Installation, Student Safety,
कल्याणमधील शाळांना सीसीटीव्ही बसविण्याच्या पोलिसांच्या सूचना

हेही वाचा – “नाव बदलून प्रश्न सुटत असतील, तर हुकूमशाहीला…”, रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका

हेही वाचा – आंदोलन चालूच राहणार, मनोज जरांगे-पाटलांची घोषणा; अध्यादेशातील ‘या’ शब्दांमध्ये सुधारणेची मागणी!

पंकजा मुंडे यांचा ताफा पुढे गेल्यानंतर आपल्या गळ्यातील चेन गायब झाल्याचे संबंधितांच्या लक्षात आले. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित पोलिसांच्या कानावर त्यांनी चोरीची कल्पना दिली, मात्र अज्ञात चोरटा सापडला नाही. याबाबत रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी काढलेले फोटो तसेच व्हिडीओ तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.