लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : औदुंबर येथे सोमवारपासून सुरु असलेल्या दत्त जयंती जयंती उत्सवाची सांगता लळित किर्तनाने गुरुवारी झाली. यावेळी शेकडो भाविक पहाटेपासून मंदीरात उपस्थित होते. रात्री १२.१५ ते १.१५ वा. धुपारती, पालखी, मंत्र पुष्पांजली आणि पहाटे ५ ते ६.३० या वेळेत वासुदेव जोशी यांचे लळीताचे कीर्तन झाले. यावेळी नितीन गुरव, संतोष जोशी यांनी तबला व सुर साथ दिली. यानंतर काकड आरती, सकाळी ६. ३० वा. महापुजा, मंगल आरती नंतर श्री दत्त जन्मोत्सवाची समाप्ती झाली.

आणखी वाचा-पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सोलापूर दौऱ्याला पुन्हा गालबोट, तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

श्री दत्त सेवा भावी मंडळाने योग्य व्यवस्थापन केल्यामुळे उत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. श्री दत्त सेवा भावी मंडळ, ग्रामपंचायत, पोलिस प्रशासन, पुजारी मंडळींच्या योग्य नियोजनाबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dutt jayanti celebrations conclude at audumbar mrj
Show comments