“महायुतीचे प्रवक्ते नेते हल्ली जी वक्तव्ये करतात त्यातून आपल्यात विसंवाद असल्याचं चित्र निर्माण होत आहे. त्यामुळे सर्वांनी जपून वक्तव्ये करा”, असा सल्ला उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना, प्रवक्त्यांना दिला आहे. शनिवारी (६ जुलै) संध्याकाळी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शासकीय योजना आणि अंमलबजावणी संदर्भात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय बैठक पार पडली. यावेळी फडणवीस बोलत होते. फडणवीस म्हणाले, कुणाला (महायुतीतील प्रवक्ते, पदाधिकारी, नेते) एकमेकांविरोधत बोलायची खुमखुमी आली असेल तर त्याने त्याच्या नेत्यांकडे जाऊन विचारायला हवं. त्यांनी आपल्या नेत्याला जाऊन विचारावं की मला बोलायची खुमखुमी आली आहे, मी बोलू का? तुमच्या नेत्यांनी परवानगी दिली तर खुशाल बोला आणि तुमची खुमखुमी दूर करून घ्या. मात्र, एक गोष्ट लक्षात घ्या आपण सर्वजण एक आहोत आणि एकच राहिलं पाहिजे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधक आपल्याविरोधात प्रचार करत आहेत, आपण एकत्र नसल्याचा अपप्रचार करू लागले आहेत. आपण जेव्हा एकमेकांविरोधात वक्तव्ये करतो तेव्हा दुर्दैवाने त्यांच्या या प्रचाराला अधिक बळ देत असतो. अशाने आपणच हिट विकेट होतो, रन आउट होतो, ही स्थिती योग्य नाही. अजित पवार यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की पक्षांमधील वरिष्ठ नेते तिकीट वाटप करतील. कोणाला कुठली जागा मिळणार? हे मंचावरील वरिष्ठ नेते ठरवतील. मी, अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीमधील वरिष्ठ नेते एकत्र बसून, चर्चा करून, एकमेकांच्या सल्ल्याने निर्णय घेऊ.

Devendra Fadnavis,
“…तर मतांचे धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल”; सज्जाद नोमानींच्या व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Devendra Fadnavis on Vote Jihad
Devendra Fadnavis : “महायुतीसमोरची एकमेव समस्या म्हणजे ‘व्होट जिहाद’ कारण..”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत, “मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, कारण..”
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “सुन लो ओवैसी…”, देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा; म्हणाले, “काहीही झालं तरी…”

उपमुख्यमंत्री म्हणाले, आपण युतीत असतो तेव्हा प्रत्येक नेत्याच्या, कार्यकर्त्यांच्या काही इच्छा, अपेक्षा असतात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या आकांक्षा असल्या तरी प्रत्येक पक्षाला काही ना काही तडजोडी कराव्या लागतात आणि आपण प्रत्येकाने तडजोडीचीच भूमिका घ्यायला हवी. तडजोडीची भूमिका घेतली नाही तर युती टिकत नाहीत. मी माझं पाहून घेतो, दुसऱ्याचं काय व्हायचं ते होऊ दे, ही भूमिका चालणार नाही. असं केलं तर आपला घात होऊ शकतो.

हे ही वाचा >> “कांदा निर्यात बंदी करू नका, त्याने अनेकांना…”, अजित पवारांची पीयूष गोयल यांना विनंती

भाजपा नेते म्हणाले, आपले विरोधक लोकसभा निवडणुकीतील विजयाने हुरळून गेले आहेत. त्यामुळे ते कुठल्याही प्रकारच्या तडजोडी करण्यासाठी तयार आहेत. मात्र आपण ताठर भूमिका घेतल्या, मी माझ्यापुरतं बघून घेईन, दुसऱ्याचं बघणार नाही, अशी भूमिका घेतली, अशा प्रकारची मानसिकता ठेवली तर आपलं नुकसान होईल. शेखचिल्ली झाडाच्या ज्या फांदीवर बसतो तीच फांदी कापतो, आपलीही तशीच गत होईल. आपण सर्वजण राजकीय नेते आहोत. आपल्याला एकत्र चालावं लागेल. एकत्र राहून निर्णय घ्यावे लागतील. एखाद्या निर्णय आवडला नाही तर त्याबाबतची आपली मतं ही चार भिंतीत ठेवायला हवीत. चार भिंतीत संवाद साधावा. मला विश्वास आहे की आपण निर्धार केला तर आपण खूप काही करू शकतो. आपण महायुतीत २०० पेक्षा जास्त आमदार आहोत. अफाट कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत. त्यामुळे आपण आगामी विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा जास्त जागा जिंकू शकतो.