“महायुतीचे प्रवक्ते नेते हल्ली जी वक्तव्ये करतात त्यातून आपल्यात विसंवाद असल्याचं चित्र निर्माण होत आहे. त्यामुळे सर्वांनी जपून वक्तव्ये करा”, असा सल्ला उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना, प्रवक्त्यांना दिला आहे. शनिवारी (६ जुलै) संध्याकाळी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शासकीय योजना आणि अंमलबजावणी संदर्भात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय बैठक पार पडली. यावेळी फडणवीस बोलत होते. फडणवीस म्हणाले, कुणाला (महायुतीतील प्रवक्ते, पदाधिकारी, नेते) एकमेकांविरोधत बोलायची खुमखुमी आली असेल तर त्याने त्याच्या नेत्यांकडे जाऊन विचारायला हवं. त्यांनी आपल्या नेत्याला जाऊन विचारावं की मला बोलायची खुमखुमी आली आहे, मी बोलू का? तुमच्या नेत्यांनी परवानगी दिली तर खुशाल बोला आणि तुमची खुमखुमी दूर करून घ्या. मात्र, एक गोष्ट लक्षात घ्या आपण सर्वजण एक आहोत आणि एकच राहिलं पाहिजे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा