सिंधुदुर्ग महसूल विभागाच्या ई-ऑफिस कार्यप्रणालीची माहिती राज्याला देण्यासाठी ई-ऑफिस परिषद येत्या १५ व १६ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली आहे. या वेळी राज्यपाल के. शंकर नारायण प्रणालीच्या पाहणीसाठी खास उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा महसूल विभागाने मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ई-ऑफिस प्रणालीचा शुभारंभ केला. देशातील पहिलाच जिल्हा म्हणून या प्रणालीसाठी कौतुकास्पद ठरला आहे. त्यामुळे राज्यातील प्रशासनाचे या प्रणालीकडे लक्ष वेधले आहे.
राज्यात ई-ऑफिस प्रणाली राबविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणार आहेत. त्यासाठी प्रथम कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची ई-ऑफिस परिषद आयोजित केली जाणार आहे.
सिंधुदुर्ग महसूल विभागातर्फे ई-ऑफिस परिषदेचे आयोजन
सिंधुदुर्ग महसूल विभागाच्या ई-ऑफिस कार्यप्रणालीची माहिती राज्याला देण्यासाठी ई-ऑफिस परिषद येत्या १५ व १६ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली आहे. या वेळी राज्यपाल के. शंकर नारायण प्रणालीच्या पाहणीसाठी खास उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.
First published on: 08-02-2013 at 05:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: E office conference arrangement by sindhudurg revenue office