अलिबाग – रेशन वितरणात पुन्‍हा एकदा सर्व्‍हरचा अडसर निर्माण झाला आहे. धान्‍य वितरणात येणारी अडचणी येत आहेत. लाभार्थ्यांना धान्यासाठी तासंतास वाट पहावी लागत आहे. सतत धान्‍य वितरणात खोडा येत असल्‍याने लाभार्थी आणि दुकानदारही मात्र वैतागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्व्हर डाऊन असल्याने ई पॉस मशीन अतिशय संथ गतीने चालत आहेत. कधी कधी पूर्णपणे ठप्प होत आहेत. त्यामुळे ग्राहकांना ताटकळत थांबावे लागत आहे. अनेकदा थांबूनही पॉस मशीन पुन्हा सुरू होईल याची शाश्वती नसते. अशावेळी लाभार्थ्यांना धान्य वितरण कसे करायचे असा प्रश्न रास्त भाव धान्य दुकानदारांना पडला आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम अंतर्गत लक्ष्यनिर्धारीत सार्वजनिक वितरण प्रणाली मार्फत ई-पॉस मशीनद्वारे लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करुन (बायोमेट्रिक ओळख पटवून) धान्य वितरण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून सर्व्‍हरमधील तांत्रिक बिघाडामुळे धान्‍य वितरणात अडथळे येत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ग्राहकांना रास्त धान्य दुकानासमोर ताटकळत उभे रहावे लागत आहे.

ई पॉस मशीन वारंवार बंद पडत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना धान्य वितरण करताना दुकानदाराना अडचणी येत आहेत. ग्राहकांच्या रोषाला मात्र दुकानदारांना सामोरे जावे लागत आहे. शासनाने तांत्रिक अडचणी दूर होत नाही तोवर ऑफलाईन धान्य वितरणास परवानगी द्यावी. – दिलीप जोग, सामाजिक कार्यकर्ते

पॉस मशीन अपडेट झाल्यानंतर सर्व्हर डाऊनची समस्या येत आहेत. मात्र या संदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहेत. लवकरच तांत्रिक अडचणी दूर होतील अशी अपेक्षा आहे. – सर्जेराव सोनावणे, जिल्हा पुरवठा अधिकारी रायगड</p>