हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर पहिल्यांदाच माथेरानमध्ये ई रिक्षा धावली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माथेरानमध्ये ही ई रिक्षाची चाचणी घेण्यात आली. यानिमित्ताने माणसाने रिक्षा ओढण्याच्या प्रथेपासून माथेरानकरांची वाटचाल सुरू झाली.

illegal parking hawker encroachment outside the premises APMC navi mumbai
‘एपीएमसी’ला अतिक्रमणाचा विळखा; बाजार समितीच्या आवाराबाहेर बेकायदा पार्किंग, फेरीवाल्यांचे बस्तान
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
pune sahakar nagar water supply cut
पुणे : शहरातील ‘ या ‘ भागात गुरुवारी पाणी नाही !
MSRTC on hike in bus fares review in marathi
विश्लेषण : एस.टी. भाडेवाढ अपरिहार्य होती का?
Mumbai corporation 540 crore cleaning drains monsoon
नाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित
Ghodbunder water shortage in old Thane
घोडबंदरपाठोपाठ जुन्या ठाण्यातही पाणी टंचाई; पाणी समस्या सोडवाच पण, तोपर्यंत टँकरने मोफत पाणी द्या, बैठकीत मागणी
Pune Traffic Congestion, Amitesh Kumar,
पुणे : कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
Review, Blue Red Flood Lines, Mula-Mutha River,
पुणे : नदीपात्राची निळी रेषा, लाल रेषा बदलणार?

माणसांमार्फत ओढल्या जाणाऱ्या रिक्षा गुलामगिरीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे देशभरात या रिक्षा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र वाहनांवर बंदी असल्याचे कारण पुढे करत रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे माणसांमार्फत ओढल्या जाणाऱ्या रिक्षांचा अमानुष प्रकार आजही सुरू आहे. ही बाब लक्षात घेऊन माथेरानमध्ये बॅटरीवर चालणाऱ्या ई रिक्षा सुरू करण्याची मागणी केली जात होती.

वारंवार मागणी करूनही पर्यावरण विभाग या मागणीला दाद देत नसल्याने माथेरान येथील निवृत्त शिक्षक सुनील शिंदे यांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने, २०२२ मध्येही माणसांमार्फत ओढल्या जाणाऱ्या रिक्षा कशा चालू राहू शकतात, अशा शब्दांत राज्य सरकारला फटकारले होते. तीन महिन्यांत ई रिक्षांची चाचणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर नगरविकास विभाग, माथेरान मॉनिटिरग कमिटी आणि रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ई रिक्षाला मान्यता घेऊन बुधवारी चाचणी घेतली. ती यशस्वी झाली.

या वेळी परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियामक मंडळ, पोलीस, महसुल, नगर विकास विभाग, माथेरान नगर परिषद आणि वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. माथेरानकरांनी ई रिक्षा चाचणीचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.

माथेरान हे पर्यावरणीयदृष्या संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखले जात असल्याने येथे वाहन वापरण्यास बंदी आहे. त्यामुळे अश्व आणि माणसांमार्फत ओढल्या जाणाऱ्या रिक्षा ही माथेरानमधील दळणवळणाची प्रमुख साधने आहेत. मध्यमयुगीन कालखंडातील वाहतुकीची साधने म्हणून ही दोन्ही माध्यमे ओळखली जातात. यांत्रिकीकरणानंतर ती कालबाह्य झाली आहेत.

मात्र पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली माथेरानमध्ये या दोन मध्यमयुगीन कालखंडातील वाहतूक साधनांचा आजही वापर केला जात आहे. माथेरानच्या पर्यटनाच्या दृष्टीने ही वाहतूक साधने आता अडसर ठरायला लागली आहेत. माथेरानमध्ये जवळपास ४०० प्रवासी आणि २०० मालवाहतूक करणारे घोडे आहेत. या घोडय़ांची लीद, मुत्र माथेरानसाठी मोठी समस्या बनली आहे. दुसरीकडे घोडे उधळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पर्यटकांचा जीव धोक्यात येऊ लागले आहेत.

दुसरीकडे माथेरानमध्ये माणसांमार्फत ओढल्या जाणाऱ्या ९२ रिक्षा चालवल्या जातात. ब्रिटिश राजवटीत माथेरानमध्ये गुलामगिरीचे प्रतीक म्हणून या रिक्षा सुरू करण्यात आल्या होत्या. कालांतराने या रिक्षा येथील वाहतुकीचे साधन म्हणून कायम राहिल्या. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही माथेरानमध्ये या रिक्षांची अमानुष प्रथा कायम राहिली. निमित्त ठरले ते माथेरानमध्ये घालण्यात आलेल्या वाहनबंदीचे. एक चालक आणि एक ते दोन सहकारी यांच्या मदतीने आजही या रिक्षांची प्रथा कायम आहे.

माथेरानमधील या रिक्षांची पद्धत बंद करून त्याऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या ई रिक्षा सुरू कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली होती. ज्येष्ठ नागरिक आणि पर्यटकांची होणारी पायपीट यामुळे टळू शकेल आणि पर्यटकांना किफायतशीर दरात प्रदूषणमुक्त प्रवासाचा पर्यायही उपलब्ध होऊ शकेल.

गेली दहा वर्षे ई रिक्षा सुरू व्हाव्यात हे स्वप्न माथेरानकर पाहात होते. आज ते साकार झाले. चाचणीला सर्वानीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ई रिक्षांमुळे माथेरानच्या पर्यटनाला चालना मिळेल आणि मानवी रिक्षाचालकांची जोखडातून मुक्ती होईल.

– सुनील शिंदे, याचिकाकर्ते.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एकदिवसीय चाचणी घेण्यात आली आहे. भौगोलिक आणि पर्यावरणीय परिस्थिती लक्षात घेऊन काही रिक्षांची चाचणी घेण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी एक परीक्षण समिती नियुक्त केली होती. त्यांच्या उपस्थितीत ही चाचणी घेण्यात आली. यात पात्र ठरलेल्या ई रिक्षांची माथेरान संनियंत्रण समितीच्या मान्यतेनंतर पुढील तीन महिने नियमित चाचणी घेण्यात येणार आहे.

सुरेक्षा भणगे, मुख्याधिकारी, माथेरान नगर परिषद

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एकदिवसीय चाचणी घेण्यात आली आहे. भौगोलिक आणि पर्यावरणीय परिस्थिती लक्षात घेऊन काही रिक्षांची चाचणी घेण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी एक परीक्षण समिती नियुक्त केली होती. त्यांच्या उपस्थितीत ही चाचणी घेण्यात आली. यात पात्र ठरलेल्या ई रिक्षांची माथेरान संनियंत्रण समितीच्या मान्यतेनंतर पुढील तीन महिने नियमित चाचणी घेण्यात येणार आहे.

सुरेक्षा भणगे, मुख्याधिकारी, माथेरान नगर परिषद

Story img Loader