धवल कुलकर्णी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी वाईन शॉप मध्ये होणा-या गर्दी पासून सुटका व्हावी आणि कोव्हिड -19 या अर्थात करोनाचा प्रसार होऊ नये म्हणून आता इ टोकन सुविधा उलब्ध केली आहे. ही सुविधा http://www.mahaexcise.com या संकेत स्थळावर सुरु करण्यात आली आहे. हा निर्णय तुर्तास पुण्यातपुरता झाल्याचे समजते आहे. मुंबईबाबतचा निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे.

ज्या ग्राहकांना मद्य खरेदी करायचे आहे अशा ग्राहकांनी या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करून इ – टोकन प्राप्त करणे गरजेचे आहे. सुरुवातीला ग्राहकाने आपला मोबाईल नंबर व नाव नमूद करायचा आहे. त्यानंतर आपला जिल्हा व पिन कोड नमूद करायचा आहे आणि सबमिट बटणवर क्लिक करायचे आहे.

असे करा रजिस्ट्रेशन 

त्यानुसार ग्राहकास आपल्या नजीक असणा-या मद्य विक्री दुकानांची यादी दिसेल. सदर पैकी एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकास करता येईल. आवश्यक माहिती नमूद केल्यानंतर ग्राहकास इ – टोकन मिळेल. सदर टोकन आधारे ग्राहक आपल्या सोयीच्या वेळी सबंधीत दुकानात जाऊन रांगेची गर्दी टाळून मद्य खरेदी करु शकतात.

मद्य विक्रीची सूट जेव्हा देण्यात आली आणि मद्य विक्रीची दुकानं जेव्हा महाराष्ट्रात उघडली तेव्हा अनेक ठिकाणी मोठी गर्दी झालेली पाहण्यास मिळाली. त्यामुळेच मुंबई आणि ठाण्यातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने तसंच वाईन शॉपही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता अशीच गर्दी होऊ नये यासाठी इ टोकनचा पर्याय देण्यात आला आहे.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: E token service started by maharashtra excise department for the purchase of liquor scj