अकोला शहरापासून २३ कि.मी. अंतरावरील बार्शिटाकळी गावाजवळ शनिवारी (११ जून) सायंकाळी ५ वाजून ४१ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. भूकंपाच्या या धक्क्यामुळे कोणतीही वित्त किंवा जीवित हानी झाल्याचे वृत्त नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ५ वाजून ४१ मिनिटांनी भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली. बार्शिटाकळी गावाजवळ या भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
हेही वाचा : कोयनानगरला भूकंपाचे सौम्य धक्के, तर उस्मानाबादमध्ये भूगर्भातील हालचालींनी हादरली घराची छपरं
रिश्टर स्केलवर ३.५० इतकी तीव्रता भूकंपाची नोंदविण्यात आली. या धक्क्यांमुळे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.