सातारा जिल्ह्यात कोयनानगर परिसराला आज (१ फेब्रुवारी) सकाळी ९ वाजून ४७ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. कराड येथील भूकंपमापन केंद्रावर या भूकंपाची नोंद ३..३ रिश्टर स्केल तीव्रतेची झाली. कोयनानगर येथील भूकंप मापन केंद्रावर त्याची नोंद २.९ रिश्टर स्केल अशी झाली. पाटण तालुक्यातील हेळगाकपासून नैऋत्येला ६ किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. त्याची खोली ५ किलोमीटर अंतरावर राहिली होती. भूकंपाचा हा सौम्य धक्का कोयनानगर परिसरातच जाणवला. अन्यत्र मात्र जाणवला नसल्याचे कराड येथील भुकंपमापन केंद्रप्रमुखांनी म्हटले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसरीकडे उस्मानाबादेत देखील आज सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी जोरदार आवाज ऐकायला मिळाले. यामुळे घरातील भांडी आणि घराचे पत्रे हादरले. हा आवाज उस्मानाबाद शहर परिसरात आणि कळंब तुळजापूर परिसरात जाणवला.

हेही वाचा : मोठी बातमी, लडाखमधील कारगिल भागात भूकंप, ५ रिश्टर तीव्रतेचे धक्के

यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देत माहिती दिली. ते म्हणाले, “हा आवाज भूगर्भातील हालचालीमुळे जाणवला असून हा भूकंप नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Earthquake in koyananagar area of satara and underground movements in osmanabad pbs