Earthquake in Pakistan : पाकिस्तानच्या करोर येथे बुधवारी ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. या भूकंपाचे धक्के दिल्ली आणि पंजाबमध्ये बसले. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. पाकिस्तानातील पेशावर, इस्लामाबाद आणि लाहोर आणि भारतातील नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, जम्मू आणि काश्मीरमध्ये त्यांना भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेस (GFZ) ने सांगितले की, पाकिस्तानमध्ये आज दुपारी १२.५८ वाजता ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. या भूकंपाची खोली १० किलोमीटर खोली होती.

Malkapur, Chainsukh Sancheti, Rajesh Ekde,
मलकापुरात विकासकामांचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी, चैनसुख संचेती आणि राजेश एकडेंमध्ये कलगीतुरा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
review of the development works was presented in the campaign of the candidate in Byculla Mumbai news
भायखळ्यातील प्रचारात विकासकामांचा लेखाजोखा
भायखळ्यातील प्रचारात विकासकामांचा लेखाजोखा
Thieves run away carrying bullets by pretending to take test drive in Kondhwa
रपेट मारण्याची बतावणी; बुलेट घेऊन चोरटा पसार, कोंढवा भागातील घटना
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई

दिल्ली आणि आसपासच्या भागात दोन आठवड्यांत भूकंपाची ही दुसरी घटना आहे. २९ ऑगस्ट रोजी, ५.७-रिश्टर स्केलचा भूकंप अफगाणिस्तानात झाला होता. या भूकंपाची खोली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून २५५ किलोमीटर होती. सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओंमध्ये छताचे पंखे, खुर्च्या आणि इतर वस्तूंना हादरे बसताना दिसत आहेत. राजस्थानमधील बिकानेर येथील एका वापरकर्त्याने टिप्पणी केली, “दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे मोठे धक्के जाणवले.”

हेही वाचा >> भूकंप का होतात? भूकंपाच्या आधीच प्राणी व पक्षांना कशी लागते चाहूल?

भूकंप का होतात?

भूकंप शब्दामध्येच याचा अर्थ दडलेला आहे. जमिनीच्या आत होणाऱ्या हालचालींमुळे होणाऱ्या कंपनांमुळे होणारी स्थिती म्हणजे भूकंप असे म्हटता येईल. ही आपत्ती का उद्भवते हे जाणून घेण्यासाठी पृथ्वीची रचना समजून घेणे आवश्यक आहे. भूगर्भशास्त्रानुसार, पृथ्वी १२ टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. या प्लेट्स अतिशय संथ गतीने फिरत असतात. कधी-कधी प्लेट्स (खडक) एकमेकांवर आदळतात किंवा त्यांची टक्कर होते. या घर्षणामुळे तयार होणारी ऊर्जा जमिनीच्या वर आल्यामुळे भूकंपाचे धक्के बसतात.

भूकंप झाल्यावर सर्वात जास्त हानी कुठे होते?

भूकंपाचे धक्के बसल्यावर तो जेथे सुरु झाला आहे, त्या ठिकाणाला भूकंपाचा केंद्रबिंदू असे म्हटले जाते. या केंद्रबिंदूच्या आसपासच्या परिसरामध्ये त्याचा सर्वाधिक प्रभाव जाणवतो. भूकंपाचा प्रभाव समजून घेण्यासाठी एका उदाहरणाची मदत घेऊया. एका शांत तळ्यामध्ये दगड टाकल्यानंतर काही लहरी निर्माण होतात. जसजश्या या लहरी पसरत जातात, तसतशी त्यांची तीव्रता कमी होत जाते. याच प्रमाणे भूकंपाच्या केंद्रबिंदूकडून भूकंपाचे धक्के जमिनीच्या पृष्ठभागावर काही अंतरापर्यंत पसरत जातात.