गेल्या वर्षी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. ईडीनं यासंदर्भात अजित पवारांशी संबंधित व्यक्तींवर धाडीही घातल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ईडीकडून अजित पवार यांच्यावर कारवाई होण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती. त्यातच राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढत असल्याचं दिसू लागलं. मात्र, या घोटाळ्यासंदर्भात आता ईडीनं चार्जशीट दाखल केली असून त्यामध्ये अजित पवार किंवा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नावच नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ईडीनं अजित पवारांना क्लीनचिट दिली का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

जुलै २०२१ मध्ये ईडीनं जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याशी संबंधित मालमत्तेवर टाच आणली होती. त्यामध्ये कारखान्याशी संबंधित भूखंड, इमारती आणि यंत्रसामग्रीचा समावेश होता. याची एकूण किंमत ६५ कोटींच्या घरात असल्याचं सांगण्यात आलं. कोरेगाव तालुक्यातला हा कारखाना काही वर्षांपूर्वी लिलावात विकला गेला. मात्र, तो तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांनी मूल्यांकनापेक्षा कमी रकमेत खरेदी झाल्याचा आरोप करण्यात आला. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर त्यावर ईडीला चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यानंतर ईडींन संपत्तीवर टाच आणली.

What Rahul Solapurkar Said?
Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकरांनी भांडारकर संस्थेचं विश्वस्तपद सोडलं, शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्यावरील माफीनाम्यानंतर राजीनामा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Mumbai crime
मुंबई : आरोपीचा न्यायालातून पळून जाण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
accused Valmik Karad treated by health department as per their medical needs no extra facilities provided
वाल्मीक कराडसह कोणत्याही आरोपीला अतिरिक्त आरोग्य सुविधा नाहीत
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
Court comments on demolishing rehabilitation building in Maharashtra Sadan objecting to municipality actions
महाराष्ट्र सदन प्रकरणातील पुनर्वसन इमारत पाडण्याच्या कारवाईवर न्यायालयाचे ताशेरे
Two burglars arrested in Madhya Pradesh news in marathi
घरफोडया करणाऱ्या दोघांना मध्‍यप्रदेशात केले जेरबंद; चार गुन्‍हयांची कबुली, साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्‍तगत
baba siddique
सिद्दिकी हत्येप्रकरणी पुन्हा चौकशी करा,झिशानला माहीत असलेले सत्य बाहेर येईल; अनिल परब

ईडीचं आरोपपत्र…

दरम्यान, ईडीनं नुकतंच राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केलं. यासंदर्भातही अजित पवार यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. मात्र, ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची नावंच नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवारांशी सबंधित कंपन्यांच्या घोटाळ्यांची चौकशी असताना त्यात अजित पवारांचंच नाव आरोपपत्रात नसल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

पुढील सुनावणी १९ एप्रिल रोजी

ईडीनं न्यायालयात चार्जशीट दाखल केली असून त्यावर पुढील सुनावणी १९ एप्रिल रोजी होणार आहे. चार्जशीटमध्ये अजित पवार यांचं नाव का नाही? यासंदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत भूमिका अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ईडीकडून अजित पवारांविरोधात स्वतंत्र आरोपपत्र दाखल केलं जाऊ शकतं, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

Story img Loader