सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवास्थानी छापेमारी करून कारवाई केल्यानंतर व त्यांच्या स्वीय सहाय्यकांना अटक केल्यापासून, पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना उधाण आलं आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपा नेत्यांकडून महाविकासआघाडी सरकारमधील नेत्यांवर निशाणा साधला जात आहे. तर, २०१९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी ED नं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या कथित २५ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याचसंदर्भात आज ईडीनं मोठी कारवाई करत साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता, इमारत आणि जमीन जप्त केली आहे. यावरून आता भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटद्वारे टिप्पणी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा