परभणी : खोटे दस्तऐवज तयार करून जिल्ह्यातील अनेक खासगी शिक्षण संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या मुख्याध्यापक, सहशिक्षक, कलाशिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनियमितपणे वैयक्तिक मान्यता प्रदान करून शासनाच्या तिजोरीवर आर्थिक भुर्दंड लादणाऱ्या प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांना निलंबित करण्यात आले आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनाही याच कारणावरून निलंबित करण्यात आले आहे.विठ्ठल भुसारे व आशा गरुड यांनी आपल्या कार्यकाळात अनेक नियमबाह्य काम केल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून होत्या. यासंदर्भात चौकशी समितीही नेमली गेली.

चौकशी समितीने शिफारशी केल्यानंतरसुद्धा या दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई होत नव्हती. याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात शेकडो कर्मचाऱ्यांना खोट्या दस्तऐवजाच्या आधारे अनियमितपणे वैयक्तिक मान्यता दिल्या. यातल्या अनेकांना वेतनही सुरू झाले. प्रत्यक्षात हे सर्व नियमबाह्य झालेले असताना शासनाच्या तिजोरीवर मात्र अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा भुर्दंड बसला. अनियमितपणे वैयक्तिक मान्यता प्रदान करून शासनावर आर्थिक दायित्व निर्माण केल्याचा ठपका ठेवून विठ्ठल भुसारे व आशा गरुड या शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. या संदर्भात राज्य शासनाचे शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव टी. वा. करपते यांनी हे निलंबनाचे आदेश सोमवारी (१० जुलै) काढले.

industry minister uday samant
हिंजवडी आयटी पार्कची कोंडी : उद्योगमंत्री उदय सामंत ‘ॲक्शन मोड’वर; अधिकाऱ्यांना दिले आदेश
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
teachers Adjustment , Group Education Officer,
शिक्षकांच्या प्रतिनियुक्तीची चौकशी, जव्हारच्या प्रभारी गटशिक्षण अधिकारी यांच्या काळात समायोजन
Kalyan Crime News in Marathi
Kalyan Crime : कल्याणमध्ये परप्रांतीयांची पुन्हा मुजोरी; चिमुरडीच्या विनयभंगाचा जाब विचारणाऱ्या मराठी कुटुंबाला मारहाण
In Kalyan East on Saturday night migrant family abused and beat up three members of Marathi family
कल्याण पूर्वेत परप्रांतीय कुटुंबीयांकडून मराठी कुटुंबाला पुन्हा मारहाण, विनयभंग प्रकरणावरून जाब विचारल्याने घडला प्रकार
Case against Kejriwal Officials claim that Lieutenant Governor gave permission
केजरीवाल यांच्याविरोधात खटला? नायब राज्यपालांनी परवानगी दिल्याचा अधिकाऱ्यांचा दावा; ‘आप’कडून खंडन
digital watch Maharashtra jail
कारागृहातील अर्थकारणावर आता “डिजिटल वॉच”; कैद्यांसह भेटायला येणाऱ्यांचे…

हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत भुसारे व श्रीमती गरुड यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबन कालावधीमध्ये महाराष्ट्र नागरी सेवा या कायद्यातील तरतुदी अनुसरून देय असलेला निर्वाह भत्ता या अधिकाऱ्यांना दिला जाणार आहे. तसेच निलंबन काळात कोणतीही खासगी नोकरी किंवा व्यवसाय करू नये, असेही या दोन्ही
शिक्षणाधिकाऱ्यांना बजावण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारची खासगी नोकरी अथवा व्यवसाय केल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल व निलंबन काळातील निर्वाह भत्ता मिळण्यास ते अपात्र ठरतील, असे स्पष्टपणे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader